4k समाचार
पनवेल दि.१०(वार्ताहर): जनसुरक्षा कायद्या रद्द करण्यासाठी पनवेलमध्ये महाविकास आघाडी व सामाजिक संघटनेच्यावतीने पायी रॅली काढण्यात आली.
महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा घोटणारा “जन सुरक्षा कायदा” लागू करण्यात आला असून, आज जन विरोधी, घटनाविरोधी, लोकशाही हक्क नाकारणारा कायदा रद्द करण्यासाठी पनवेल महाविकास आघाडी व सामाजिक संघटना यांच्या वतीने पायी रॅली छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा ते पनवेल बस डेपो येथे काढण्यात आली.

यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत, जन सुरक्षा विधेयक विरोधी समिति प्रमुख उल्का महाजन, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादी (श.प.) जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, स.पा. जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, शेकाप नेते काशीनाथ पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, रामदास पाटील, महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, महानगर संघटक गुरूनाथ पाटील, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, शहर प्रमुख प्रवीण जाधव, शहर प्रमुख यतीन देशमुख, शहर प्रमुख सदानंद शिर्के, शहर प्रमुख रामदास गोवारी,

उपशहर प्रमुख हरेश पाटील, शहर संघटक संतोष गोळे, गणेश खांडगे, प्रशांत नरसाळे, अमोल गोवारी, भास्कर पाटील, मुकुंद पाटील, राजेश शेट्टीगार, शिवसेना महिला आघाडीच्या लीना गरड, महिला आघाडी शहर संघटिका अर्चना कुळकर्णी, उज्वला गावडे, तेजस्वी घरत, निर्मला म्हात्रे, माधुरी गोसावी, शशिकला सिंग, विलास फडके, प्रकाश म्हात्रे, गौरव पोरवाल, दिलीप कदम, राजेश केणी, नारायण घरत, विश्वास पेटकर, नरेंद्र गायकवाड, राज सदावर्ते, सुभाष गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी केंद्र व राज्य सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.
