4K दि. समाचार
पनवेल | कामोठे येथील शंभो मित्र मंडळाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुलांच्या नृत्यस्पर्धा तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याला विशेष आकर्षण प्राप्त झाले.

गणरायाचे विसर्जन ढोल-ताशांच्या गजरात, भक्तिमय वातावरणात पार पडले. मंडळाचे अध्यक्ष तेजस जाधव यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंडळाला भेट देऊन कार्यकर्त्यांचे कौतुक केले. तसेच जय डिगोळे यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला आणखी रंगत आली.
स्थानिक नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे उत्सवाचा उत्साह द्विगुणित झाला.
