नवीन बातम्या
केदार भगत यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त सुवासिक उटण्याचे वाटप उटण्याच्या पाकिटांवर ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’चा संदेश; रामशेठ ठाकूर यांनी केले कौतुक
Open Channels FM: Web Summit Gender In Tech Report Reveals Gaps in Tech Leadership, Pay, and AI for Women
साईनाथ पवार यांना मानद डॉक्टरेट पदवीसह ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव; पुण्यात दोन्ही सन्मान प्रदान
अनंत गीते यांच्या हस्ते शिवसेनेच्या दिवाळी सुगंधी उटण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ  उपनेते बबनदादा पाटील यांच्यासह पदाधिकारी, महिला आघाडी व शिवसैनिकांची उपस्थिती
डेरवली जिल्हा परिषद शाळेत आकाशकंदील कार्यशाळा उत्साहात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; पर्यावरणपूरक दिवाळीचा दिला संदेश
दुकानदारांच्या समस्या आणि महागाईच्या प्रश्नावर संघटना आक्रमक
कोल्हापूरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पनवेलच्या शिवसैनिकाचा मदतीचा हात
राहुल गोगटे यांच्या पुढाकाराने २०० जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
प्रशांत सोनवणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त १०० महिलांना साड्यांचे वाटप ९ नोव्हेंबरला जुने पनवेल येथे आयोजन; आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा स्वाभिमानी पुरस्काराने सन्मान
अखिला मेमोरियल ट्रस्टतर्फे आदिवासी बांधवांना दिवाळी भेट

हॅप्पी सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त १००० ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार – सामाजिक बांधिलकी आणि आध्यात्मिक यात्रांची घोषणाने उत्साह

4k समाचार  दि. 10
नवी मुंबई | अल्पसंख्याक आयोग महाराष्ट्र राज्याचे सदस्य मा. हॅप्पी सिंग जी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार, दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ५.३० वा. भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात तब्बल १००० ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले.



या कार्यक्रमाला आमदार प्रशांत दादा ठाकूर, आमदार विक्रांत दादा पाटील, माजी नगरसेवक नितिन भाई पाटील, बाळासाहेब पाटील, आमदार अविनाश कोळी, आमदार परेश दादा ठाकूर, आमदार प्रीतम दादा म्हात्रे, माजी नगरसेवक गणेश कडू, माजी नगरसेवक विकास घरत, माजी नगरसेवक विजय चिपळेकर आणि ज्येष्ठ नेते उस्मान सिंग सिद्धू आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.



विशेष कार्यक्रमांतर्गत श्री. हरमंदिर साहिब दर्शन त्रिप्ती (अमृतसर, पंजाब), अकाळ तख्त दर्शन आणि गुरुद्वारा श्री दमदमा साहिब अशा आध्यात्मिक यात्रांची घोषणाही करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन सौ. हरजिंदर कौर हॅप्पी सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. वाढदिवसानिमित्त समाजहिताच्या विविध योजनांची घोषणा करून उपस्थित नागरिकांना आनंदित करण्यात आले.



या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे भजन-कीर्तन कार्यक्रम, ज्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले होते.
या भव्य कार्यक्रमामुळे परिसरात उत्साह, ऐक्य आणि सामाजिकतेचे विशेष वातावरण निर्माण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top