नवीन बातम्या
अनोळखी ईसमाचा मृतदेह सापडला
पनवेलमध्ये महानगर गॅस कामांची प्रत्यक्ष पाहणी; रस्ते दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना
*विकासकामांच्या खोदकामात वीजवाहिन्या तुटण्याच्या त्रासातून पनवेलकरांची सुटका; नगरसेवक ॲड. प्रथमेश सोमण यांच्या पुढाकाराने ‘टास्क फोर्स’ होणार कार्यान्वित*
हृदयातील ब्लोकेजमुळे पत्रकार गौरव जहागिरदार उपचारासाठी मदतीच्या प्रतीक्षेत
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त करंजाडे शहरात वृक्षारोपण उपक्रम; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश.
“स्वराज्याच्या स्मरणार्थ, पर्यावरणासाठी वृक्षारोपण”
लोकनेते रामशेठ ठाकूर ‘रयत’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिवसेना (उद्धव बाळा साहेब ठाकरे) पक्षाचा देवद पनवेल शाखा वर्धापन दिंन मोठ्या उत्साहत संपन्न
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर

पनवेलमध्ये नमो युवा रनचे भव्य आयोजन – स्वस्थ व नशामुक्त भारतासाठी युवा शक्तीचा निर्धार


4k समाचार दि. 22
पनवेल (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने “स्वस्थ आणि नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी” या शीर्षकाखाली आज (दि. २१) पनवेलमध्ये “नमो युवा रन”चे भव्य आयोजन करण्यात आले होते. या धावस्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागांतून हजारो युवक-युवतींनी आणि उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात सहभागी युवकांनी ‘फिट इंडिया’ चा नारा देत व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला. शहरातील सुंदर अशा वडाळे तलाव येथून तीन किलोमीटर अंतराच्या या “नमो युवा रन”चे उदघाटन नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ ३ चे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.  



   यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, राजेश भगत, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, पनवेल उत्तर मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, पनवेल पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, जिल्हा चिटणीस रविनाथ पाटील, उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, अनेश ढवळे, कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, सोशल मीडिया संयोजक सुशील शर्मा, जगदिश घरत, अमित ओझे, अभिषेक पटवर्धन, प्रीतम म्हात्रे, केदार भगत, रुपेश नागवेकर, प्रशांत मोरबाळे, विनेश कदम, अशोक साळुंखे, चिन्मय समेळ, अक्षय सिंग, मयूर कदम, तेजस जाधव, नितेश पाटील, देवांशू प्रभाळे, कोमल कोळी, शिवानी घरत, यांच्यासह पदाधिकारी, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.  



  या स्पर्धेनंतर विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व धावपटूंचे अभिनंदन करून त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. तसेच या उपक्रमामुळे युवकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन नशामुक्त समाजाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आल्याचे मान्यवरांनी नमूद केले. युवक, युवती आणि महिलांची उपस्थित मोठ्या प्रमाणात व लक्षणीय होती. यावेळी आयोजकांकडून स्पर्धकांचे स्वागत करून त्यांना स्पर्धेसाठी प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी उत्साह, आनंद आणि सामूहिक तालमेल यावर आधारित झुम्बा आयोजित करण्यात आले होते.  “नमो युवा रन” अत्यंत शिस्तबद्ध, उत्साही आणि यशस्वी वातावरणात पार पडली, त्यामुळे हा उपक्रम युवकांमध्ये आरोग्य, क्रीडाभावना, सामाजिक जबाबदारी आणि व्यसनमुक्त जीवनशैली याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. या नमो युवा रन मध्ये पुरुषांच्या गटात राज भगत यांनी प्रथम, सुहास माळी यांनी द्वितीय आणि विकास ठिकडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच महिलांच्या गटात प्रथम क्रमांक जान्हवी चोगले, द्वितीय क्रमांक प्रथमा भगत आणि तृतीय क्रमांक काजळ प्रजापती यांनी पटकावला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top