4,kNews कामोठे
पनवेल, दि. ६ (वार्ताहर) : माँसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल शहर शाखेच्या वतीने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून मानवंदना देण्यात आली. यावेळी पदाधिकारी व शिवसैनिकांनी माँसाहेबांच्या कार्याचे स्मरण करून आदरांजली वाहिली.

यावेळी विभागप्रमुख प्रविण जाधव, शहर संघटिका उज्वला गावडे, प्रभागप्रमुख प्रशांत नरसाळे, ग्राहक कक्षाचे कुणाल कुरघोडे, शाखाप्रमुख संतोष तळेकर, मयुरेश पाटील, अश्विनी देसाई, अरुण ठाकूर, राम मंजुळे, अतुल टेमघरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

माँसाहेबांच्या विचारांचा व सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

