नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज, न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त)येथे आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा संपन्न







4k समाचार दि. 3
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या समन्वयाने आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 

  या आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेचे उद्‌घाटन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळाचे संचालक तसेच पनवेल महानगरपालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.त्याचबरोबर  चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेजचे प्राचार्य व मुंबई शहर झोन-१चे उपाध्यक्ष मा. प्रो. डॉ. एस.के.पाटील यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मुंबई शहर झोन-१ सचिव डॉ.मनोज वर्मा , मुंबई शहर झोन-१ स्पर्धा सचिव डॉ. व्ही. बी. नाईक व मुंबई उपनगर सचिव डॉ. निलम पाटील  यांची उपस्थिती लाभली.



  या स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठातील ४२२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. तसेच पुरुषांमध्ये प्रथम सर्वात्कृष्ट खेळाडूचे स्थान ठाकूर महाविद्यालय, कांदिवली,  द्वितीय स्थान आर.जे. महाविद्यालय, घाटकोपर आणि तृतीय स्थान के. ई. श्रॉफ  महाविद्यालय, कांदिवली यांनी पटकावले त्याचबरोबर महिला विभागामध्ये प्रथम सर्वात्कृष्ट खेळाडूचे स्थान ठाकूर महाविद्यालय, कांदिवली, द्वितीय स्थान एस.आय.ई.एस महाविद्यालय, नवी मुंबई  आणि  तृतीय वर्तक महाविद्यालय, वसई यांनी पटकावले.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. व्ही. बी. नाईक, सहसंचालक प्रा. अनिल नाक्ती, प्रा. भरत जितेकर व प्रा. प्रतिज्ञा पाटील जिमखाना विभागाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top