तलावात आढळला मृतदेह

4k समाचार
पनवेल दि. ०3( संजय कदम  ) : येथील तलावामध्ये कुजलेल्या अवस्थेमध्ये एक  मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत . 


                  

सदर अनोळखी इसमाचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे , डोक्याचे केस काळे, पांढरे, संपुर्ण शरीर कुजलेले होवुन ठिकठिकाणी शरिराची त्वचा निघालेली, अंगात ग्रे रंगाचा हाफ बाहयाचा टि-शर्ट त्यावर निळया रंगामध्ये होलीस्टर कॅलिफोर्निया असे लिहिलेले व त्याच्यावर निळया रंगामध्ये पक्षी उडतानाचे लोगो दिसत आहेत तसेच काळया रंगाची फुल पॅन्ट घातलेली आहे . याबाबत काहीएक माहिती मिळाल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे येथे संपर्क करावा अगर समक्ष येवून माहिती दयावी. तसेच सहा. पोलीस निरीक्षक राजेंद्र घेवडेकर मो. नं ९११७९६६५५५, नेमणूक पनवेल शहर पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top