नवीन बातम्या
7 Best WordPress MCP Servers and Plugins in 2026 (We Tested Them All)
How to Convert Images to WebP in WordPress (Free, No CDN)
Open Channels FM: The Core Principles of the Open Web, Simplified
Free WPVibe Alternative: Easy MCP AI vs WPVibe (Pricing, Limits, Reviews)
WordCamp Central: WordCamp Sylhet 2026: No Swag, All Heart
पनवेलमध्ये भाजपची सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांची संघटनात्मक बैठक संपन्न! ; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी पक्षकार्याचा आढावा; संघटनात्मक बळकटीकरणावर भर
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह मान्यवरांकडून भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट!
विहिरी-बोअरवेलचे सर्वेक्षण, भूजल पुनर्भरण आणि प्रभागनिहाय जलसुरक्षा आराखडा तयार करण्यासाठी राजेंद्र शर्मा यांचे महापौर आणि आयुक्तांना निवेदन
हायकल कंपनीतील कामगारांना दरमहा २० हजारांची पगारवाढ; जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या करारामुळे विविध सुविधांचा लाभ!

ए-टाईप परिसरात दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; जलवाहिनी सर्वेक्षणाची मागणी पाण्याचे प्रयोगशाळेत परीक्षण करून अहवाल सादर करण्याची नगरसेविका अस्मिता घरत यांची मागणी

4kNews कामोठे दि. 31 पनवेल (प्रतिनिधी) : पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मधील ए-टाईप परिसरात नागरिकांना दूषित व कडवट पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, कावीळसदृश आजारांची प्रकरणेही समोर येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या समस्येची दखल घेत नगरसेविका अस्मिता घरत यांनी माजी नगरसेविका […]

शेल इंडिया कंपनीतील कामगारांना दरमहा १३ हजारांची पगारवाढ! जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या यशस्वी प्रयत्नांना मोठे यश; वैद्यकीय विमा, बोनससह विविध सुविधांचा लाभ

4kNews कामोठे दि. 31 पनवेल (प्रतिनिधी) : तळोजा औद्योगिक क्षेत्रातील शेल इंडिया कंपनीमध्ये कार्यरत सफाई कामगारांना दरमहा १३ हजार रुपयांची पगारवाढ मिळणार आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या करारामुळे कामगारांना वेतनवाढीसह विविध सुविधा मिळणार आहेत. करारानुसार, प्रत्येक कामगाराला तीन […]

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधातील गेट बंद आंदोलन स्थगित  १९ स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याचे कंपनी प्रशासनाचे आश्वासन; अजित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश

4kNews कामोठे उरण, दि. ३१ (विठ्ठल ममताबादे) : खोपटे येथील मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीत स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी सुरू असलेले गेट बंद आंदोलन तिसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑक्टोबरपासून हे आंदोलन सुरू होते. आंदोलनाची […]

मास्टर मरीन मेहेर यार्ड -खोपटे कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन !

4kNews कामोठे स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सामावून घेण्याची मागणी; अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनउरण दि. 31(विठ्ठल ममताबादे)  उरण तालुक्यातील खोपटे येथील मास्टर मरीन मेहेर यार्ड कंपनीविरोधात स्थानिक रोजगाराच्या प्रश्नावर तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गुरुवार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून गेट बंद आंदोलन करण्यात येणार आहे.मोठेखार (वरचा भाग )प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना […]

२६ जिल्ह्यांतील १० हजारांहून अधिक वीज कंत्राटी कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन
वेतन, रोजगार सुरक्षा आणि प्रलंबित लाभांसाठी एल्गार; मागण्या मान्य न झाल्यास ६ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलनाचा इशारा

4kNews कामोठे उरण, दि. 31 (विठ्ठल ममताबादे) : वेतन, रोजगार सुरक्षा, कंत्राटदारांकडून होणारा कथित अन्याय आणि प्रलंबित आर्थिक लाभांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या (भारतीय मजदूर संघ) नेतृत्वाखाली २७ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. राज्यातील २६ जिल्ह्यांतील १० हजारांहून अधिक कंत्राटी कामगार या आंदोलनात सहभागी झाले. महावितरणच्या मुंबईतील प्रकाशगड मुख्य कार्यालयासमोर सकाळी आंदोलन […]

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात स्थानिकांचे गेट बंद आंदोलन! १९ प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना एकाच वेळी नोकरीत सामावून घेण्याची मागणी; अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन

उरण, दि.  31(विठ्ठल ममताबादे) : खोपटे येथील मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीत स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी व व्यवसायाच्या संधींमध्ये प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) कंपनीच्या प्रवेशद्वारावर गेट बंद आंदोलन सुरू करण्यात आले. कंपनी प्रशासनासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने आंदोलन बेमुदत सुरू ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला. मोठेखार (वरचा भाग) […]

डाउन सिंड्रोमवर मात करत पार्थची समुद्री भरारी; सात वर्षीय आदीचा नवा विक्रम!
दोन्ही सख्ख्या भावांनी १८ किलोमीटरचे समुद्री अंतर केले पार; पार्थला ६ तास ५७ मिनिटे, तर आदीला ५ तास ५६ मिनिटे

4kNews कामोठे उरण, दि.  31(विठ्ठल ममताबादे) : जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर कोणतेही आव्हान पेलता येते, हे उरणमधील पार्थ आणि आदी निशांत पाटील या सख्ख्या भावांनी सिद्ध केले आहे. एलिफंटा लेणी (घारापुरी) ते नागाव-पिरवाडी बीच असे सुमारे १८ किलोमीटरचे समुद्री अंतर दोघांनी यशस्वीरीत्या पोहून पूर्ण केले. विशेष म्हणजे, डाउन सिंड्रोम असलेल्या १३ वर्षीय पार्थने […]

किशोरवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी ‘उडान… नवी आशा–नवी दिशा’ उपक्रम पनवेलमध्ये ४५० विद्यार्थिनी व शिक्षकांचा सहभाग; सायबर सुरक्षेसह स्वसंरक्षणाचे मार्गदर्शन

4kNews कामोठे दि. 31 पनवेल : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-३, पनवेल यांच्या वतीने ‘उडान… नवी आशा–नवी दिशा’ हा जनजागृतीपर कार्यक्रम २८ ऑक्टोबर रोजी पनवेल येथील अण्णासाहेब वर्तक सभागृहात आयोजित करण्यात आला. किशोरवयीन मुलींना सोशल मीडिया, ऑनलाइन चॅटिंग, वैयक्तिक माहिती व छायाचित्रे शेअर करणे तसेच ऑनलाइन ब्लॅकमेलिंग यांपासून सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चैत्र फाउंडेशन, […]

कामोठे सेक्टर १७ मध्ये उघड्या डीपींमुळे जीविताला धोका!

4kNews कामोठे जय गुरुदेव कॉम्प्लेक्स परिसरातील महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांची नाराजी; दुर्घटनेपूर्वी दुरुस्तीची मागणीपनवेल, दि. 31 (वार्ताहर) : कामोठे सेक्टर १७ मधील जय गुरुदेव कॉम्प्लेक्सजवळ तसेच परिसरातील अनेक ठिकाणी महावितरणच्या विद्युत वितरण पेट्या (डीपी) उघड्या अवस्थेत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. डीपीमधील उघड्या वायरींमुळे लहान मुले, पादचारी आणि शाळकरी विद्यार्थ्यांना विजेचा धक्का लागण्याची भीती […]

महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या प्रवीण जाधव यांची मागणी; दिवाळीत मुलांसाठी ‘अलबत्या गलबत्या’ नाटक मोफत दाखवा! मोबाईलच्या वाढत्या वापरातून मुलांना रंगभूमीकडे वळविण्यासाठी महापौर आणि आयुक्तांना निवेदन

4kNews कामोठे पनवेल, दि.31(वार्ताहर) : दिवाळीच्या सुट्टीत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘अलबत्या गलबत्या’ हे बालनाट्य मोफत आयोजित करावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या प्रवीण जाधव यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मुलांमधील मोबाईलचा वाढता वापर लक्षात घेता त्यांना मनोरंजनासोबतच सांस्कृतिक अनुभव मिळावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. यासंदर्भात २८ ऑक्टोबर २०२६ रोजी […]

Back To Top