नवीन बातम्या
करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींची चालना!
पुढील तीन महिन्यांत विकासकामांना सुरुवात; मच्छीमारांच्या प्रश्नांना प्राधान्य
NIEPID RC NM खारघरचे घवघवीत यश!
नृत्य व संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत मानाचा तुरा
मेहफिल-ए-अनुराग’मध्ये शास्त्रीय संगीताचा सुरेल आविष्कार ‘संस्कृतीर दिशारी’चा तिसरा सांस्कृतिक सोहळा रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात
वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देशाला समर्पित
उरण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन
बाप्पा मोरया’ घरगुती गणपती सजावट स्पर्धा
भाजपतर्फे आयोजन; २५ हजार रुपयांपर्यंतची पारितोषिके
अदानी एअरपोर्ट्समध्ये ९,८२५ कोटींची गुंतवणूक
विमानतळ विस्तार, आधुनिकीकरण आणि ‘एअरपोर्ट सिटी’ विकासाला मिळणार चालना
१०३ निविदांमध्ये ६५ ते ७० टक्के कमी दराने निविदाअत्यल्प दरामुळे कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; भरत पाटील यांची सखोल चौकशीची मागणी
तंत्रज्ञान आणि विश्वासामुळे NBFC-HFC क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा : RBI उपराज्यपाल एस. सी. मुर्मू
कर्करोग उपचारासाठी केवळ वय हा निकष नसावा
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कर्करोग चिकित्सा क्लिनिक सुरू

बाप्पा मोरया’ घरगुती गणपती सजावट स्पर्धा
भाजपतर्फे आयोजन; २५ हजार रुपयांपर्यंतची पारितोषिके

4kNews कामोठे दि. 10

पनवेल (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी, पनवेलतर्फे गणेशोत्सवानिमित्त ‘बाप्पा मोरया’ घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या कलागुणांना वाव देतानाच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणे हा स्पर्धेचा उद्देश आहे.



स्पर्धेतील विजेत्यांना एकूण २५ हजार रुपयांपर्यंतची आकर्षक पारितोषिके, तसेच चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सजावटीसाठी थर्माकोलच्या वस्तूंचा वापर करण्यास सक्त मनाई असून पर्यावरणपूरक साहित्याचा वापर अनिवार्य आहे.
ही स्पर्धा पनवेल शहरातील प्रभाग क्रमांक १४, १८, १९ व २० मधील रहिवाशांसाठी खुली आहे. सहभागी होण्यासाठी १२ सप्टेंबर २०२६पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी QR कोड स्कॅन करावा किंवा ८७६७१४९२०३ या क्रमांकावर संपर्क साधावा. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.



नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पनवेल महापालिकेचे नगरसेवक तथा माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top