नवीन बातम्या
अभियंता प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी आमदार प्रशांत ठाकूर भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर; पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन
जीवनगौरव पुरस्काराबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा सत्कार पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने शासकीय विश्रामगृहात गौरव
नवीन शेवा व शेवा कोळीवाडा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार.
रेट्रोफिटिंग कामांचा थकीत निधी द्या; पाणीपुरवठा कंत्राटदारांचे आझाद मैदानात बेमुदत धरणे
४८ तासांत ६६ तोळे सोने हस्तगत; आरोपी सोलापुरातून ताब्यात
कर्ज देण्याच्या आमिषाने ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी जेरबंद चार आरोपी अटकेत; ३.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
जन्म-मृत्यू विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
माहितीच्या अधिकारात अपील करताच दाखला मिळाल्याचा अर्जदाराचा दावा
स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचा १२वा वर्धापनदिन उत्साहात  गुरुपौर्णिमा उत्सवात विद्यार्थ्यांचा बहारदार कलाविष्कार
सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन सराईत आरोपी अटकेत
७.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच गुन्ह्यांची कबुली

मुलींच्या सुरक्षेसाठी पनवेल मनपाचे पथनाट्य अभियान

4kNews कामोठे

पनवेल, दि. २५ : पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे शालेय विद्यार्थी व युवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘पथनाट्य जनजागृती अभियान’ सुरू करण्यात आले. महापौर नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय, शाळा क्र. १ येथे या अभियानाचा शुभारंभ झाला. 



या अभियानातून अल्पवयीन मुलींचे शोषण रोखण्यासाठी ‘गुड टच-बॅड टच’, तसेच युवकांमधील मानसिक ताण व नैराश्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. अडचणीच्या काळात पालक, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तींशी संवाद साधून योग्य वेळी मदत घेण्याचा संदेश पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला.



महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता प्रितम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले हे अभियान महापालिकेच्या शाळांसह खासगी शाळा, मॉल, उद्याने, बाजारपेठा आणि नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या सार्वजनिक ठिकाणी टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.



यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती ममता प्रितम म्हात्रे, प्रभाग समिती सभापती अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, प्रतिभा भोईर, प्रिती जॉर्ज, रुचिता लोंढे, डॉ. प्रियंका कांडपिळे, डॉ. अस्मिता घरत, योगिता फडके तसेच महापालिका अधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. 



“प्रत्येक मुलीला सुरक्षिततेची जाणीव आणि प्रत्येक युवकाला अडचणीच्या काळात योग्य आधार मिळणे आवश्यक आहे. मुलांनी व युवकांनी मनातील समस्या मोकळेपणाने व्यक्त करून योग्य वेळी मदत घ्यावी. सुरक्षित बालपण आणि सकारात्मक युवा पिढी घडविणे हाच अभियानाचा मुख्य उद्देश आहे.”
ममता प्रितम म्हात्रे, सभापती, महिला व बालकल्याण समिती, पनवेल महानगरपालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top