नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

मुबंई विद्यापीठ युवा महोत्सवात उरण महाविद्यालयाचे यश

4k समाचार
उरण दि १२(विठ्ठल ममताबादे )
मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या सांस्कृतिक युवामहोत्सवा मध्ये कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाला मुक अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि भारतीय लोक नृत्य या स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला आहे.कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय व उरण कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा युवा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

या स्पर्धेत एकूण २७ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक तुषार गावरे, आकाश कांबळे तसेच थिएटर साठी प्रसिद्ध लेखक निखील पालांडे, गौरव रेळेकर यांनी केले. या युवा महोत्सवसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे, जेष्ठ प्राध्यापक व माजी प्राचार्य प्रा. किशोर शामा, यांचे मार्गदर्शन लाभले.

महाविद्यालयाची सांस्कृतिक समितीचे सर्व सदस्य, प्रा. रियाज पठाण , प्रा. हन्नत शेख, प्रा. डॉ. आनंद गायकवाड, डॉ. अनुपमा कांबळे, प्रा. डॉ. मारोती लोणे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यालयीन अधीक्षक तानाजी घ्यार यांचे विशेष सहकार्य लाभले. कोंकण ज्ञानपीठ संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top