नवीन बातम्या
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना
पनवेलमध्ये कोळी परिवाराच्या गणेशोत्सवात ‘श्री नरसिंह अवतार’ देखावा भाविकांचे आकर्षण
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांसोबत स्नेहभोजन
आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये फायर अवेअरनेस प्रोग्राम आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाचे प्रशिक्षण
उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश; ४० वर्षांच्या संघर्षाला निर्णायक दिशा

*वर्षावास निमित्त धम्म बांधवांची गृह भेट उपक्रम*

4kNews कामोठे दि. 2

पनवेल: दिनांक २९ जुलै २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने वर्षावास (आषाढी पौर्णिमा) निमित्त धम्म बांधवांची गृह भेट हा उपक्रम उत्साहात पार पडला. तथागत बुद्धांच्या पहिल्या उपदेश दिनानिमित्त (धम्मचक्क पवत्तन सुत्त) आयोजित या कार्यक्रमास धम्म बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



सदर कार्यक्रमाचे आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक मंडळाचे सचिव आयु. मुकुंद रोटे व त्यांच्या परिवाराच्या निवासस्थानी, खादा कॉलनी, पनवेल येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित बांधवांच्या स्वागताने झाली. त्यानंतर कुटुंबाचा परिचय करून देण्यात आला.



कार्यक्रमात बुद्ध वंदना घेण्यात आली आणि उपस्थितांनी धम्माचे विचार आत्मसात करण्याचा संकल्प व्यक्त केला. शेवटी उपस्थितांसाठी खीर व अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.



या उपक्रमातून धम्म बंधुत्व वृद्धिंगत करण्यासह सामाजिक एकात्मता मजबूत करण्याचा संदेश देण्यात आला. वर्षावास दरम्यान मंडळाच्या वतीने अशा प्रकारचे उपक्रम दर रविवारी सकाळी १० ते ११ यावेळात राबविण्यात येणार असल्याचे सांगितले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top