नवीन बातम्या
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना
पनवेलमध्ये कोळी परिवाराच्या गणेशोत्सवात ‘श्री नरसिंह अवतार’ देखावा भाविकांचे आकर्षण
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांसोबत स्नेहभोजन
आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये फायर अवेअरनेस प्रोग्राम आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाचे प्रशिक्षण
उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश; ४० वर्षांच्या संघर्षाला निर्णायक दिशा

पनवेलमध्ये कोळी परिवाराच्या गणेशोत्सवात ‘श्री नरसिंह अवतार’ देखावा भाविकांचे आकर्षण


4kanews कामोठे दि. 18
पनवेल (प्रतिनिधी) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेचा आणि सांस्कृतिक वारशाचा गेल्या ६५ वर्षांपासून अखंड जागर करणाऱ्या पनवेल येथील श्री. मदन कोळी परिवाराच्या गणेशोत्सवाला यंदाही भक्ती आणि कलात्मकतेची अनोखी जोड लाभली आहे. दरवर्षी आपल्या आकर्षक व वैविध्यपूर्ण देखाव्यांमधून गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेणाऱ्या कोळी परिवाराने यंदा ‘श्री नरसिंह अवतार’ हा देखावा साकारला असून, तो भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. 



हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. मदन कोळी परिवाराच्या गणेशमूर्तीची आकर्षक सजावट श्री साई आर्ट्स, कल्याण, रमेश जाधव आणि गणेश जाधव यांनी साकारली आहे. देखाव्याला भावपूर्ण आणि कलात्मक रूप देण्यासाठी पडदा पेंटिंग रमेश डुकरे, तर निवेदनाची जबाबदारी अॅड. प्रथमेश सोमण आणि अथर्व गोडबोले यांनी सांभाळली आहे. देखाव्याची भव्यता अधिक खुलविणारी आकर्षक रोषणाई नवीन पनवेल येथील जनार्दन केणी आणि सुरज भोईर यांनी साकारली आहे.भक्ती, कलात्मकता आणि सामाजिक प्रबोधन यांचा सुंदर संगम साधणारा हा ‘श्री नरसिंह अवतार’ देखावा गणेशभक्तांना आध्यात्मिक अनुभूती देत असून, परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या देखाव्याला भेट देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top