नवीन बातम्या
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना
पनवेलमध्ये कोळी परिवाराच्या गणेशोत्सवात ‘श्री नरसिंह अवतार’ देखावा भाविकांचे आकर्षण
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांसोबत स्नेहभोजन
आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये फायर अवेअरनेस प्रोग्राम आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाचे प्रशिक्षण
उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश; ४० वर्षांच्या संघर्षाला निर्णायक दिशा

मानवता फाउंडेशनतर्फे दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना छत्री वाटप; वृक्षारोपणातून निसर्ग संवर्धनाचा संदेश

4kNews कामोठे दि. 2

पाच्छापूर (सुधागड) : सामाजिक बांधिलकी जपत मानवता फाउंडेशनच्या वतीने सुधागड तालुक्यातील दुर्गम भागातील सोमजाई शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालय, पाच्छापूर येथील गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत ये-जा करताना होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मानवता फाउंडेशनचे अध्यक्ष संजयभाऊ पवार, उपाध्यक्ष विनोद नायर, सचिव विघ्नेश मगानी, संस्थेचे ट्रस्टी दीपकजी घोसाळकर, विशाल बाबर तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 


या प्रसंगी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. सामाजिक सेवा आणि निसर्ग संवर्धन यांचा समतोल साधत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमाबद्दल शाळेच्या प्रशासनाने व विद्यार्थ्यांनी मानवता फाउंडेशनचे आभार मानले. भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांद्वारे गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा मानस फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top