4k समाचार
पनवेल दि.०९ (संजय कदम) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त कामोठे शहरात शहरप्रमुख रामदास गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाप्रमुख प्रिमियर लीग क्रिकेट सामने दि बा पाटील मैदानावर खेळविण्यात आले होते.

यामध्ये एकूण 26 टीम सहभागी झाल्या होत्या. यामध्ये सेक्टर 35 शाखाप्रमुख सुरेश मोरे व विभागप्रमुख बबन गोगावले यांच्या टीम नी प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक सेक्टर 21 शाखा व तृतीय क्रमांक सेक्टर 8 शाखाने पटकावला. या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज शिवा लंके ठरला. यावेळी राज्य संघटक विलास व्हावळ,

उपमहानगर प्रमुख प्रभाकर गोवारी, शहरप्रमुख रामदास गोवारी, धाया गोवारी, जया शाहू, एकनाथ गोवारी, विजय गोवारी, महिला आघाडी, युवा सेना, ग्राहक संरक्षण कक्ष व सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण स्पर्धेसाठी शहर संघटक संतोष गोळे यांनी अथक मेहनत घेतली
फोटो : शाखाप्रमुख प्रिमियर लीग क्रिकेट सामने
