4k समाचार
उरण दि 06 (विठ्ठल ममताबादे ) भाविक भक्तांना श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या भारतातील महान संत साईबाबा यांना मानणारा वर्ग उरण तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असून उरण मध्ये अनेक साई मंदिरे आहेत तिथे नियमितपणे नित्य नियमाने दररोज पूजा आरती भजन केले जाते.अनेक वर्षांपासून साईभक्तांतर्फे तसेच विविध मंडळा तर्फे उरण ते शिर्डी पायी पदयात्रेचे आयोजनही केले जाते. अशाच मंडळापैकी ॐ श्री साईराम पदयात्रा मंडळ उरण हे मंडळ एक आदर्श मंडळ असून गेली चोवीस वर्षे अखंडपणे नित्यनेमाने श्री साई मंदिर अंबिकावाडी उरण ते शिर्डी अशी पदयात्रा मंडळातर्फे काढली जात आहे.

यंदाचे पदयात्राचे रौप्य महोत्सवी असे पंचविसावे वर्ष आहे. या मंडळातर्फे रविवार ०५/१०/२०२५ ते सोमवार १३/१०/२०२५ या कालावधीत उरण ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मंडळाचे पदाधिकारी सदस्य, साईभक्त उरण मधून शिर्डी कडे जाण्यासाठी रवाना झाले आहेत. साईबाबाचे नामस्मरण करत भक्तीगीत गात हे पदयात्री १३/१०/२०२५ रोजी शिर्डीत पोहोचणार आहेत. गुरुवार दिनांक १६/१०/२०२५ रोजी सायंकाळी ५ ते १० या वेळेत श्री साई मंदिर, अंबिकावाडी नागाव उरण येथे श्री साई भंडाराचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ४ वाजता श्रीच्या चरण पादुका, पालखी पूजन, काकड आरती, पुढील प्रस्थान, दुपारी १२ वाजता मध्यान्ह आरती व श्री साई चरित्र अध्याय पारायण, दुपारी ३ वाजता ॐ श्री साईनाथाय नमः मंत्राचा जप व पुढील प्रस्थान, सायंकाळी ६:३० वाजता धूप आरती, ६:३० ते ८ भजन कीर्तन भारूड प्रवचन असा पदयात्रेतील दैनंदिन कार्यक्रम आहे.

सदर पदयात्रा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष- संदीप ठाकूर नागाव, उपाध्यक्ष- लक्ष्मीकांत पाटील नागाव, सचिव विजय घरत अंबिकावाडी, उपसचिव गणेश पाटील उरण कोटनाका, खजिनदार हिम्मत पाटील केगाव दांडा, दत्तात्रेय भोईर – उरण, भजन प्रमुख कपिल म्हात्रे, पालखी प्रमुख उमेश भोईर कोटनाका, दीपक म्हात्रे नागाव, खानपान चाया म्हात्रे – न्हावा, मधुकर पाटील- नागाव,नागूबाई घरत-अंबिकावाडी, शांताताई संजय भोईर-न्हावा, महिला हरिपाठ मंडळ -प्रमिला घरत – अंबिकावाडी, नयना नाईक – टाकिगाव,निराबाई घरत – अंबिकावाडी सल्लागार जनार्दन घरत – अंबिकावाडी, बळीराम गायकवाड, हरिभाऊ नाईक- टाकीगांव तसेच सर्व पदयात्री, कारसेवक साई भक्त विशेष मेहनत घेत आहेत.
