नवीन बातम्या
खारघरवासीयांच्या आग्रहास्तव रंगणार ‘दिवाळी संध्या’!
गायिका आर्या आंबेकर यांच्या सुरेल गीतांची मैफल; कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य
माझं पनवेल’ हे नावच पनवेलकरांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करते – रामशेठ ठाकूर
माझं पनवेल’च्या १३व्या दिवाळी विशेषांकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
चांगू काना ठाकूर महाविद्यालयात ‘दिवाळी बाजार’ उत्साहात  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि उद्योजकीय कौशल्यांना मिळाले व्यासपीठ
माईंडस्पेस फ्युजनच्या ‘फेस्टिव्ह बाजार’ला ५ हजारांहून अधिक नागरिकांची भेट खरेदी, खाद्यपदार्थ, संगीत आणि कलाविष्कारांनी दोन दिवसीय महोत्सवात रंगत
संतोष भगत यांच्याकडून यंदाही मुलांना फटाक्यांचे वाटप
फटाके भेट देत चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद
दिवाळीचा आनंद साजरा करा, पण सुरक्षिततेला प्राधान्य द्या!  घरफोडी, चोरी आणि सायबर फसवणूक टाळण्यासाठी कामोठेकरांनी सतर्क राहावे; वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांचे आवाहन
महिनाभरात पैसे दुप्पट करण्याचे आमिष; चार जणांना ७२.९८ लाखांचा गंडा उरणमधील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल
औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेला वेग; ऑक्टोबरमध्ये ५४४ नियामक कारवाया
११ ठिकाणी छापे; १.३४ कोटींचा औषधे व सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त, चौघांना अटक
WordCamp Central: A Shoutout to Meahadi Hasan: From the Classroom to the Global WordPress Community

उरण तालुका वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नवनियुक्त पोलीस निरीक्षकांची सदिच्छा भेट…


4k समाचार 
उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजात शांतता नांदावी यासाठी रात्रंदिवस आपले कर्तव्य चोखपने बजावणारे पोलीस अधिकारी कर्मचारी या देशाचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. समाजात जातीय सलोखा,शांतता, समानता प्रस्थापित करण्यासाठी पोलिस प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरते. उरण तालुक्यात सर्व जाती धर्माची नागरिक  सुखाने, गुण्या गोविंदाने एकत्र राहतात.उरण मध्ये अनेक विविध राष्ट्रीय प्रकल्प,कंपन्या आहेत. अनेक महत्वाचे कारखाने आहेत, औद‌योगिक परिसर आहे.  

त्यामूळे येथील पोलिस डोळ्यात तेल घालून रांत्रदिवस चोख कर्तव्य बजावत असतात.अशा उरण सारख्या महत्वाच्या ठिकाणी उरण पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक एच. डी. मुलाणी यांची नियुक्ती झाली. त्यांनी उरण पोलिस ठाण्यात पद‌भार स्विकारला असल्याने सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी झटणाऱ्या व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष   डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या उरण तालुका  वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उरण पोलीस ठाणे कार्यालयात वरिष्ठ पोलिस निरीक्षक एच डी मूलानी यांचा उरण पोलिस ठाणे मध्ये पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.  याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी उरण तालुका पदाधिकारी  अध्यक्ष तुकाराम खंडागळे, कोषाध्यक्ष साहेबराव ओहोळ, उपाध्यक्ष तुषार गायकवाड, सदस्य ईश्वर ढोले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top