4k समाचार
उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून रविवार दि १४ सप्टेंबर २०२५ रोजी भिवंडी ते जासई (उरण तालुका )असे नवी मुंबई मार्गे “दिबा मानवंदना कार रॅली” चे आयोजन करण्यात आलेले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दिबा पाटील साहेबांचे नाव देण्याच्या मागणीकडे केंद्र/राज्य सरकारचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर रॅली ही भिवंडी माणकोली येथून सकाळी ९ वाजता प्रस्थान करणार असून नवी मुंबईतून पुढे जासई करिता मार्गस्थ होणार आहे त्या धर्ती वर नवी मुंबई आणि लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या त्यागातून १२.५% भूखंडाचा लाभ घेतलेल्या आणि प्रत्येक दिबा प्रेमींना आयोजकांमार्फत आवाहन करण्यात आले आहे की दिबा साहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने रॅली चे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहावे आणि रॅली मध्ये सहभागी व्हावे
