नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय – श्री गुरु तेग बहादुर साहिब जींच्या ३५०व्या शहादत शताब्दी व श्री गुरु गोबिंद सिंह जींच्या ३५०व्या गुरता गादी शताब्दी राज्य स्तरावर साजरी करण्यात येणार



4k समाचार 
मुंबई: दिनांक: १३ सप्टेंबर २०२५
महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक व मैलाचा दगड ठरणारा निर्णय घेत १२ सप्टेंबर २०२५ रोजी अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या GR नुसार खालील दोन महान गुरुपर्व राज्य स्तरावर भव्य पद्धतीने साजरे केले जाणार आहेत –
• “हिंद दी चादर – श्री गुरु तेग बहादुर साहिब जींची ३५०वी शहादत शताब्दी”
• श्री गुरु गोबिंद सिंह जींची ३५०वी गुरता गादी शताब्दी 



हे दोन्ही ऐतिहासिक गुरुपर्व महाराष्ट्र शासनाच्या संपूर्ण सहकार्याने आणि शहादत शताब्दी समागम समित्यांच्या संयुक्त नियोजनातून आयोजित केले जातील.

📍 प्रमुख समागम स्थळे:
• नांदेड़ – १५ व १६ नोव्हेंबर २०२५
• नागपूर – ६ डिसेंबर २०२५
• नवी मुंबई (MMR) – २० व २१ डिसेंबर २०२५

GR मधील प्रमुख मुद्दे:

कार्यक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी राज्य स्तरावरील समित्या गठीत केल्या जाणार
संत ज्ञानी हरनाम सिंह जी खालसा व ११ सदस्यीय सिख समन्वय समिती यांच्या भूमिकेची दखल
सिख, सिकलीगर, लबाणा, बंजारा, मोहयाल आणि इतर गुरु नानक नाम लेवा समाजाचा सक्रिय सहभाग
सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यवस्थापकीय बाबींमध्ये शासनाकडून पूर्ण सहकार्य

हा GR संपूर्ण महाराष्ट्रातील सिख समाजाने आनंदाने स्वागत केला असून, तो गुरु तेग बहादुर साहिब जींच्या शहादतीची आणि गुरु गोबिंद सिंह जींच्या शिकवणीची अधिकृत मान्यता असल्याचे मानले जात आहे.



निवेदन – संत ज्ञानी हरनाम सिंह जी खालसा:

“आम्ही महाराष्ट्र शासन व माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांचे मनःपूर्वक आभार मानतो की त्यांनी या ऐतिहासिक शताब्दींची अधिकृत दखल घेतली. गुरु साहिबांच्या कृपेने व शासनाच्या सहकार्याने हे समागम ऐक्य, बलिदान आणि आत्मिक शक्तीचे प्रतीक ठरणार आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top