नवीन बातम्या
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार

महापालिकेची खारघर, पनवेलमध्ये अतिक्रमण विभागाच्यावतीने तोडक कारवाई,





पनवेल,दि.10 : (4kNews)पनवेल महानगरपालिकेच्यावतीने अतिक्रमण विभागांतर्गत प्रभाग कार्यालयाच्यावतीने गेल्या दोन दिवसापासून खारघर, पनवेलमध्ये अनधिकृतपणे रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या निर्देशानूसार तोडक कारवाई करण्यात येत आहे. फूटपाथवर तसेच रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे महापालिकेच्यावतीने ही  कारवाई करण्यात आली.



पनवेल मधील रायगड बाजार मार्केट यार्ड येथे भाजी खरेदी विक्री करणाऱ्यांची गर्दी कायम असते तसेच नागरिकांची व किरकोळ भाजी विक्रेत्यांची खरेदी करण्यासाठी येजा सुरू असते. अशावेळी रस्त्यांच्या कडेला अनधिकृतरित्या फळ विक्री व भाजी विक्री करणाऱ्या व्यवसायिकांमुळे सर्वसामान्यांना चालणे कठिण होऊन जाते. त्यामुळे महापालिकेच्यावतीने अनधिकृत व्यवसायिकांवरती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने करवाई करण्यात आली. तसेच  मार्केट यार्ड मधील रस्त्याच्या कडेला अनधिकृतरित्या बांधलेल्या शेडवर तोडक कारवाई करण्यात आली.



याच पध्दतीने नवीन पनवेलमधील गणेश मार्केट येथे अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यांवरून  जाण्यायेण्यास त्रास होत असल्याने आयुक्त श्री. मंगेश चितळे यांनी अतिक्रमणावरती कडक कारवाई करण्याचे आदेश  प्रभाग कार्यालयास दिले होते. त्यानूसार आज दिनांक 10 डिसेंबर रोजी नवीन पनवेलमधील गणेश मार्केट परिसरातील फुटपाथवरील अनधिकृत उभारलेल्या टपऱ्यांवरती अतिक्रमण विभागाच्यावतीने तोडक कारवाई करण्यात आली.


तसेच खारघरमध्ये सेक्टर 19 मध्ये फुटपाथवरील अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांवरती ,त्यांच्या शेडवरती अतिक्रमण विभागाच्यावतीने तोडक कारवाई करण्यात आली. प्रभाग समिती क कामोठे अंतर्गत फुटपाथवरील अनधिकृत व्यवसायिकांवर कारवाई करून सामान जप्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top