पनवेल, पोदी (२८ जुलै): ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा, पोदी – पनवेल महानगरपालिका येथे आज एक प्रेरणादायी उपक्रम पार पडला. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन अॅड. मनोज कृष्णाजी भुजबळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पगारे मॅडम, शिक्षकवृंद तसेच समाजसेवक किशोर शिंदे यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या वह्यांचे मोफत वितरण हा उपक्रम अत्यंत उपयुक्त आणि कौतुकास्पद ठरला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयीची रुची वाढण्यास मदत होणार असून, समाजात शिक्षणप्रेमी दृष्टिकोन वाढविण्यास हातभार लागणार आहे.
