नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

पनवेल एस.टी. आगारात नवीन अत्याधुनिक बसेस दाखल – प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते लोकार्पण



पनवेल, दि. २८ जुलै (4K समाचार)
पनवेलकर प्रवाशांसाठी आजचा दिवस आनंददायक ठरला, कारण पनवेल एस.टी. आगारात नवीन अत्याधुनिक बसेस दाखल झाल्या असून, या बसेसचे लोकार्पण पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मा. प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.


या उपक्रमामुळे पनवेलमधील सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि आधुनिक होणार आहे. प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार विविध सुविधांनी सज्ज अशा या बसेस नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत.

या लोकार्पण कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली होती
मा. नगरसेवक श्री. गणेश कडू,
मा. नगरसेविका सौ. प्रीती जॉर्ज,
मा. नगरसेविका सौ. सारिका भगत,
परिवहन विभागीय वाहतूक अधिकारी श्री. अमित गिरमे,
वाहतूक अधिकारी श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे,
पनवेल आगार व्यवस्थापक सौ. अश्विनी फाळके,
श्री. संजय पाटील आणि इतर कर्मचारी वर्ग.



या बसेस मिळवण्यासाठी पनवेलचे आमदार मा. प्रशांत ठाकूर आणि आमदार विक्रांत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याचे फलित आज प्रत्यक्षात उतरले आहे.
प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीचा नवा अध्याय –
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व मा. अजित पवार, तसेच परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक आणि राज्यमंत्री मा. माधुरी मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना साकारली गेली.


🔹 प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी यावेळी सांगितले, “पनवेलकर नागरिकांसाठी ही सुविधा म्हणजे एक नवा प्रवासाचा अध्याय आहे. ही आधुनिक वाहतूक व्यवस्था भविष्यात आणखी विस्तारली जाईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top