नवीन बातम्या
पनवेलमध्ये भाजपची सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांची संघटनात्मक बैठक संपन्न! ; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी पक्षकार्याचा आढावा; संघटनात्मक बळकटीकरणावर भर
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह मान्यवरांकडून भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट!
विहिरी-बोअरवेलचे सर्वेक्षण, भूजल पुनर्भरण आणि प्रभागनिहाय जलसुरक्षा आराखडा तयार करण्यासाठी राजेंद्र शर्मा यांचे महापौर आणि आयुक्तांना निवेदन
हायकल कंपनीतील कामगारांना दरमहा २० हजारांची पगारवाढ; जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या करारामुळे विविध सुविधांचा लाभ!
पनवेलमध्ये स्वर्णमेघ ज्वेलर्सचा शुभारंभ; नगरसेवक परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन!
ए-टाईप परिसरात दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; जलवाहिनी सर्वेक्षणाची मागणी पाण्याचे प्रयोगशाळेत परीक्षण करून अहवाल सादर करण्याची नगरसेविका अस्मिता घरत यांची मागणी
शेल इंडिया कंपनीतील कामगारांना दरमहा १३ हजारांची पगारवाढ! जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या यशस्वी प्रयत्नांना मोठे यश; वैद्यकीय विमा, बोनससह विविध सुविधांचा लाभ
मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधातील गेट बंद आंदोलन स्थगित  १९ स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याचे कंपनी प्रशासनाचे आश्वासन; अजित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश
मास्टर मरीन मेहेर यार्ड -खोपटे कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन !

मैत्रेय राजश्री गणेश मोकलला आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक”

4k समाचार
पनवेल दि. १९ ( वार्ताहर ) :  मैत्रेय राजश्री गणेश मोकल याने  थिम्पू, भूतान येथे आयोजित आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत ९३ किलो वजनी गटामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक (GOLD MEDAL) पटकावल्या बद्दल त्याचे पनवेलमध्ये कौतुक होत आहे . 

  दरम्यान टाटानगर, झारखंड येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक जिंकले होते. त्या उल्लेखनीय कामगिरीच्या आधारावर त्यांची आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली होती. मैत्रेय यांना शिवछत्रपती पुरस्कार विजेते संतोष शिंदे यांचे मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभले. त्यांची जिद्द, चिकाटी आणि अथक प्रयत्न यांच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. या स्पर्धेसाठी अध्यक्ष, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण यांनी आर्थिक निधी उपलब्ध करून मैत्रेयला मोलाचे सहकार्य केले व आशीर्वाद दिले. या स्पर्धेत जगभरातून १५० स्पर्धक सहभागी झाले होते. भारतातून एकूण ३० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. मैत्रेय यांच्या या सुवर्णमयी कामगिरीबद्दल  त्याचे सर्वत्र मनःपूर्वक कौतुक होत आहे. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top