नवीन बातम्या
महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांचा सपत्नीक सत्कार
उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न
विंधणे कोळीवाड्यात ‘एकविरा आई प्रसन्न’ मच्छीमार सहकारी संस्थेची स्थापना
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात पोलिसांचा रूट मार्च
अटल सेतूवरून विघ्नहर्ताची दिमाखदार स्वारी
भव्य महाआगमनाने कामोठे झाले ‘विघ्नहर्तामय’
माँसाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त तळोज्यात आयुष्मान-आभा कार्ड शिबिर
कळंबोलीकर तहानले; सिडकोविरोधात शिवसेना आक्रमक
राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत सी.के.टी. महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक
इनर व्हील क्लब ऑफ पनवेल. डिस्ट्रिक्ट ३१३; सीमेवरील जवानांसोबत रक्षाबंधन

कळंबोली–रोडपाली–कामोठे (मानसरोवर रेल्वे स्थानक) लिंक रोडच्या विकासासाठी नगरसेविका सौ. बायजा बबन बारगजे यांचे महापौरांना निवेदन


4kNews कामोठे दि 25
पनवेल : कळंबोली–रोडपाली–कामोठे (मानसरोवर रेल्वे स्थानक) प्रस्तावित लिंक रोड तातडीने विकसित करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका सौ. बायजा बबन बारगजे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या महापौरांकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सदर लिंक रोड विकसित झाल्यास कळंबोली, रोडपाली आणि कामोठे परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना सुरक्षित, जलद आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळेल. भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतूक लक्षात घेता या रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घेणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 


यावेळी नगरसेविका सौ बायजा बबन बारगजे भाजपा भटके विमुक्त मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बबनराव बारगजे, कळंबोली / रोडपाली कामोठे लिंक रोड कृती समितीचे प्रमुख महेंद्र खबाले, राजेंद्र सूर्यवंशी तसेच भाजपा पदाधिकारी सौ कमल सरगर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही नागरिकांच्या हितासाठी हा महत्त्वाचा लिंक रोड लवकरात लवकर विकसित करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. 


या मागणीच्या निवेदनाच्या प्रती पनवेल महानगरपालिकेचे माननीय आयुक्त मंगेश चितळे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, शहर अभियंता राजेश कर्डिले तसेच सभागृह नेते प्रकाश बिनेदार यांनाही देण्यात आल्या असून, या महत्त्वाच्या प्रश्नावर तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला दिलासा मिळावा आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळावी यासाठी महानगरपालिकेने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून लिंक रोडचे काम तातडीने सुरू करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top