उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या भूगोल विभागातील प्रा.अनुपमा राजकुमार कांबळे यांनी आपल्या शैक्षणिक कार्याचा एक नवा शिखर गाठला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्यातर्फे त्यांना भूगोल विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील ग्रामीण विकासावर दुग्ध व्यवसायाचा सामाजिक-आर्थिक परिणाम, पुणे (महाराष्ट्र) या विषयावर त्यांनी सखोल आणि अभ्यासपूर्ण संशोधन केले.

या संशोधन प्रक्रियेमध्ये त्यांना एसपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील वामनराव गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. अनुपमा यांच्या या उल्लेखनीय यशामध्ये राजकुमार कांबळे , अनुराज कांबळे ,अन्विता कांबळे यांच्यासह त्यांचे इतर सर्व कुटुंबीय आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे, भूगोल विभाग प्रमुख डॉ. आनंद गायकवाड, माजी प्रभारी प्राचार्य डॉ. एम. जी. लोणे तसेच महाविद्यालय विकास समिती सदस्य, सर्व शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी वृंद, मित्र, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

उरण परिसरातील शैक्षणिक व सामाजिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचे मार्गदर्शन लाभलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे एक प्रेरणादायी पाऊल ठरत आहे.या शैक्षणिक सन्मानाबद्दल प्रा. अनुपमा कांबळे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
