नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

बेस्ट सेलर ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाची डुप्लिकेट पुस्तके जप्त; बोगस पुस्तक विक्रेता पोलिसांच्या ताब्यात


4k समाचार दि. 1
सुप्रसिद्ध लेखक व व्याख्याते जगदीश ओहोळ यांचे बेस्ट सेलर ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाच्या नकली पुस्तकांची विक्री करणाऱ्या पुस्तक विक्रेत्यास पनवेल खांदा कॉलनी पोलिसांनी सापळा लावून रविवारी सायंकाळी 7:30 वाजता 125 बोगस नकली पुस्तकांसह ताब्यात घेतले. 



याबाबत सविस्तर वृत्त असे की नवीन पनवेल येथे संविधान महोत्सव सुरू आहे. या संविधान महोत्सवामध्ये सामाजिक कार्यकर्ते महादेव वाघमारे यांनी ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक प्रत्यक्ष खरेदी केले, शंका आल्याने ते पुस्तक लेखक जगदीश ओहोळ यांना दाखविले, व ते पुस्तक नकली असल्याची खात्री पटल्यानंतर वाघमारे यांनी खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या सूचना व मार्गदर्शना नुसार पोलीस निरीक्षक शैलेश भद्रे टीमने  रविवारी संध्याकाळी सापळा रचून नकली ग्राहक पाठवून छापा टाकला. यावेळी 125 पुस्तके नकली पुस्तके देताना विक्रेता मनमोहन मिश्रा(वय 30 वर्ष, राहणार खांदेश्वर, नवी मुंबई) यास रंगेहात पकडले व ताब्यात घेतले. यावेळी मिश्रा याने ही पुस्तके डुप्लिकेट आहेत हे मला माहित आहे, त्यांची विक्री करतोय असा जबाब दिला.



लेखक जगदीश ओहोळ (वय 36, रा. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सदर कारवाई करण्यात आली. जगदीशब्द पब्लिकेशन पुणे, यांचेकडून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलेले आहे. सदर पुस्तकाचे निमिर्ती, वितरण व प्रकाशनाचे सर्व हक्क व अधिकार लेखक व जगदीशब्द फाउंडेशन- पब्लिकेशन पुणे यांच्याकडे राखीव आहेत.  
कारवाईत नावे मनमोहन मिश्रा त्याचे ताब्यात असलेल्या बॉक्स ची पाहणी केली असता त्यामध्ये  “जग बदलणारा बापमाणूस”  या पुस्तकाची १२५ (पायरेटेड) डुप्लीकेट पुस्तके मिळून आली असून बाजारात त्याची किंमत ४३,७५०/- रुपये इतकी आहे. यावेळी पंच म्हणून प्रवीण जठार व अनिकेत भंडारे यांनी काम पाहिले.



वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांचे मार्गदर्शनप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शैलेश भद्रे, पोलीस कॉन्स्टेबल वैभव शिंदे यांच्या टीमने ही कामगिरी केली.
जगदीश ओहोळ यांनी तक्रार दिलेने खांदा कॉलनी शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता 2023 नुसार कलम 318, 51 व 63 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन (पायरेटेड ) डूप्लीकेट पुस्तके आणखीन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्या पुस्तकाची वितरण, विक्री व छपाई करणारे मूळ सूत्रधाराचा पोलीस कसुन शोध घेत आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शैलेश भद्रे अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top