नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

४९ वर्षीय महिलेचा एआरडीएसवर यशस्वी उपचार

4k सामाचार
पनवेल दि. ०१ ( वार्ताहर ) : मेडिकव्हर हॉस्पिटलच्या टीमने ४९ वर्षीय दिलारा या महिलेवर झालेल्या अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (ARDS) या जीवघेण्या स्थितीवर यशस्वी उपचार केले. सुरुवातीला फ्लूसारखी लक्षणे असलेली रुग्ण काही दिवसांत गंभीर अवस्थेत पोहोचली आणि तिचे ऑक्सिजन सॅच्युरेशन फक्त ३०% होते. 


   फुफ्फुस तज्ज्ञ डॉ. शाहिद पटेल आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. अदिती जैन यांच्या नेतृत्वाखाली त्वरित व्हेंटिलेटर सपोर्ट, संसर्ग नियंत्रण आणि सतत मॉनिटरिंग करण्यात आले. श्वास घेण्यास मदत करण्यासाठी ट्रेकिओस्टोमी करण्यात आली आणि दोन आठवड्यांत रुग्णाला व्हेंटिलेटरवरून हटवण्यात यश आले. नंतर फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशनमुळे रुग्णाची उर्जा व चालण्याची क्षमता पुनर्संचयित झाली. तीन आठवड्यांत पूर्णपणे बरे होऊन दिलारांना डिस्चार्ज देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top