नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघरमध्ये सामाजिक कार्यक्रम

4k समाचार दि. 5
पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या खारघरचा राजा मंडळाने आयोजित केलेल्या ‘महाराणी पैठणीची’ या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंडळाच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. समाजाची सेवा करण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.



खारघरचा राजा मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराणी पैठणीची हा कार्यक्रम खारघर सेक्टर ५ येथील आई माता मंदिरात आयोजित केला होता. या कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमातील विविध स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या महिलांना महाराणी पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच, केंद्र सरकारद्वारे राबवलेल्या कल्याणकारी योजनांवर आधारित प्रश्नांची योग्य उत्तरे देणाऱ्या महिलांना विशेष बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व महिलांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते साडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, खारघरचा राजा मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील, दीपक शिंदे, महिला मोर्चाच्या जिल्हा चिटणीस संध्या शारबिद्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top