नवीन बातम्या
*नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ*
महाराष्ट्र सरकारने चवदार तळे परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विशेष आभार
इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट
पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लालचंद यादव  यांची बिनविरोध निवड
पहाटे वाहनांना आग
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली

पनवेल (प्रतिनिधी ) भारत घडवणारे व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, भारतरत्न माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची १०० वी जयंती आज (दि. २५) पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अटलजींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.  

    

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिवादन केल्यानंतर आदरांजली वाहताना म्हंटले कि, आपला देश आपले लाडके माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची १०० वी जयंती अर्थात सुशासन दिवस साजरा करत आहे. उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे मुत्सद्दी राजकारणी म्हणून ते आजही अगणित लोकांना प्रेरणा देत आहेत. त्यांनी आधुनिक भारताची उभारणी करण्याचे स्वप्न पाहिले होते. देशातील सर्वांना विशेषत: गरीब आणि वंचित घटकांना केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केले.  त्याच वेळी त्यांच्या सरकारने अनेक आर्थिक सुधारणा करून भारताच्या आर्थिक उत्थानाचा पाया रचला.  त्याच मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा काम करत आहेत.

अटलजींनी आपल्या जीवन प्रवासात समृद्ध साहित्यकृतींच्या निर्माता असलेल्या या लेखक आणि कवी मनाच्या व्यक्तिमत्त्वाने आपल्या लेखनात शब्दांचा वापर हा प्रेरणा देण्यासाठी, विचार करायला प्रवृत्त करण्यासाठी केला. ते सर्व वयोगटातील लोकांच्या मनात घर करून राहिलेआहेत. भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वातून शिकता आले आहे. आपल्या देशाच्या क्षमतेवर असलेला अटलजींचा अढळ विश्वास आपल्या सर्वांना उच्च ध्येय आणि कठोर परिश्रम करण्यासाठी सतत प्रेरणा देत आहे, असेही त्यांनी नमूद करत आदरांजली वाहिली. 

 यावेळी भाजपचे शहर सरचिटणीस अमित ओझे, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमितजाधव,  माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, कामगारनेते जितेंद्र घरत, युवा मोर्चाचे दिनेश खानावकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, अशोक साळुंखे, महेश पाटील, राम म्हात्रे, महेंद्र म्हात्रे, काळुराम फडके, नवनाथ पाटील, आकाश फडके, सुदेश फडके, विजय पाटील, किशोर चौतमोल, आकाश यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top