नवीन बातम्या
Open Channels FM: Why Real-Time Threat Detection Matters for Website Security
नैना विकासाला मोठी चालना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून टाऊन प्लॅनिंगला गती, शेतकऱ्यांच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय 
रायगड जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष पवार
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथे जिल्हास्तरीय बाल सुरक्षा व वाहतूक विषयक बैठक संपन्न;
पनवेल शहर अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अनुसूचित जाती-जमातीच्या उप-वर्गीकरणाला तीव्र विरोध; पनवेल प्रांत अधिकाऱ्यांना दिले निवेदन
पनवेल येथील डॉक्टरांची वारकरी भवन पंढरपूर येथे आरोग्य सेवा संपन्न.
ऑल इंडिया एअरपोर्ट्स एव्हिएशन एम्प्लॉईज राष्ट्रीय युनियनचे उद्घाटन; सचिन केणी यांना सरचिटणीसपदाची संधी
शिक्षण क्षेत्रात सुसूत्रता आणण्यासाठी आर्टिफिशल इंटेलिजन्स चा वापर ही काळाची गरज
— सुप्रसिद्ध विकासक अशोक छाजेड
पर्यावरणमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

रायगड जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष पवार

4kNews कामोठे दि. 28
पनवेल/प्रतिनिधी — महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी एन ई (१३६) जिल्हा शाखा रायगडच्या नवीन अध्यक्ष निवडीसह इतर रिक्त पदांसाठी रविवारी २६ जुलै पेण येथील ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये जिल्हाध्यक्ष पदासह संघटनेच्या सर्वच्या सर्व रिक्त पदांची निवड पूर्णपणे बिनविरोध करण्यात आली. 



जिल्हा कार्यकारिणी, तालुका पदाधिकारी आणि जिल्ह्यातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि सर्वांच्या एकमताने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड निश्चित करण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी संतोष धर्मा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नवनियुक्त रायगड जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष संतोष धर्मा पवार, उपाध्यक्ष उमाजी माडेकर, महिला उपाध्यक्ष रेश्मा  ठाकूर, सचिव जितेंद्र म्हात्रे, कार्याध्यक्ष सुशांत चिले, सहसचिव अमोल तांबडे, कोषाध्यक्ष श्वेता कदम, संघटक मयुर प्रकाश कारखानीस, महिला संघटक गुलाब म्हात्रे, कायदे सल्लागार गणेश गायकर, प्रसिद्धी प्रमुख प्रचित मसाल लेखापरीक्षक रुपम गावंड, कौन्सिलर (सल्लागार)अनिल पवार, नरेंद्र यशवंत, सुदिन पाटील, योगिता पलंगेया या निवडीनंतर जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जाहीर अभिनंदन केले असून, नवीन कार्यकारिणी संघटनेच्या प्रलंबित मागण्या आणि हितासाठी जोमाने काम करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top