नवीन बातम्या
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन

लवकरच ‘अटल करंडक एकांकिका’ स्पर्धेच्या १२ व्या पर्वाचा शुभारंभ
०६ नोव्हेंबरपासून राज्यातील केंद्राची प्राथमिक फेरी



4k समाचार दि. 5
पनवेल (प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका’ स्पर्धेचे यंदा १२ वे वर्ष असून त्या अंतर्गत राज्यातील प्राथमिक केंद्रांच्या प्राथमिक फेरीला ०६ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. 


   नाट्य चळवळ वृद्धींगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृद्धींगत व्हावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा हे ब्रीदवाक्य घेऊन अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. स्पर्धेचे देखणे व नीटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्टये आहेत. या स्पर्धेत नवनवीन संकल्पना आणि दर्जेदार एकांकिका सादर होत असल्याने हा करंडक महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध झाला असून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत स्पर्धेचा आवाका वाढला आहे. गेल्या ११ वर्षांत स्पर्धेने नाट्यविश्वात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. स्पर्धेचे देखणे व नीटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, सर्वोत्तम स्पर्धास्थळ आणि दर्जेदार परीक्षणामुळे ही स्पर्धा नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.

स्पर्धेतील अंतिम फेरीतील विजेत्या प्रथम क्रमांकास एक लाख रुपये, प्रमाणपत्र आणि मानाचा अटल करंडक, द्वितीय ७५ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक ५० हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी १० हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह तसेच लक्षवेधी एकांकिकेला ३० हजार रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्कृष्ठ विनोदी एककांकिकेला २० हजार रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह आणि इतरही वैयक्तिक पारितोषिके देऊन कलाकारांना गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेतील सोलापूर केंद्राची प्राथमिक फेरी ०६ नोव्हेंबरला, कोल्हापूर ७ नोव्हेंबर, रत्नागिरी ८ नोव्हेंबर, नाशिक १५ नोव्हेंबर, जळगाव १६ नोव्हेंबर, पुणे २२ व २३ नोव्हेंबर, रायगड २६ व २७ नोव्हेंबर आणि मुंबई व ठाणे केद्रांची प्राथमिक फेरी २८, २९ व ३० नोव्हेंबर रोजी नियोजित केंद्रांवर होणार आहे. तर महाअंतिम फेरी ५, ६ आणि ७ डिसेंबर रोजी पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top