नवीन बातम्या
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्तपदी मयुर भुजबळ ; पदभार स्वीकारला
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर
जागतिक आदिवासी दिन उरण मध्ये उत्साहामध्ये संपन्न
साई ट्रस्ट ज. ने. पोर्ट विद्यालयाचा
कु. नमित प्रदीप वाघावले राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत १० वा तर उरण तालुक्यातून १ला
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटेवर मदतीचा हात
नामदार ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हजारो विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, छत्री व वह्यांचे वाटप
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे आणि माजी आमदार देवेंद्र साटम यांची उपस्थिती

गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटेवर मदतीचा हात
नामदार ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हजारो विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, छत्री व वह्यांचे वाटप
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे आणि माजी आमदार देवेंद्र साटम यांची उपस्थिती

4kNews कामोठे दि. 12

पनवेल (प्रतिनिधी) : ‘शिक्षण हेच खरे सामर्थ्य’ या विचारातून समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्यासाठी अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हजारो विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, छत्री आणि वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कर्जत फाटा जवळील एन. डी. स्टुडिओ येथे या भव्य सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 



या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे आणि माजी आमदार देवेंद्र साटम उपस्थित राहणार आहेत.
आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, तसेच त्यांना शैक्षणिक साहित्याची कमतरता भासू नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याबरोबरच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देऊन उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजक अशोक छाजेड यांनी सांगितले..



या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध होणार असून, त्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी, विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष ॲड. संतोष खांडेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top