4k समाचार
पनवेल, दि.25 (संजय कदम) ः रात्रीच्या वेळी चोरलेली गाडी अज्ञात चोरट्याने गावाजवळील नदीत टाकून तो पसार झाल्याची घटना घडली असून गावकर्यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी ती गाडी पाण्यातून बाहेर काढली आहे.

पनवेल जवळील भिंगारी येथे कांदेवाडी या ठिकाणी राहणार्या एका डबेवाल्यांची दुचाकी गाडी ज्याची किंमत जवळपास 1 लाख 40 हजार रुपये इतकी आहे ती अज्ञात चोरट्याने चोरली. ही चोरी त्या भागातील सीसीटीव्हीमध्ये दिसून आली आहे. त्यानंतर सदर गाडी ही गावाजवळील नदीमध्ये टाकून दिल्याचे आढळून आले आहे. ग्रामस्थांनी त्वरित तेथे धाव घेवून सदर गाडी पाण्यातून बाहेर काढली आहे. आता अज्ञात चोरट्याचा शोध ग्रामस्थ करीत आहेत.
