पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक २०२५ चे आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत खारघरमध्ये दिनांक ०६ ते ०९ फेब्रुवारी पर्यंत भव्य दिव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

खारघर मधील सेक्टर १४ येथील जय हनुमान चेरोबा बापदेव मैदानावर भव्य क्रिकेट स्पर्धा दिवस-रात्र या स्वरूपात होणार आहे. या स्पर्धेत २४ संघ खेळणार असून या स्पर्धेतील विजेत्या संघाला १ लाख ११ हजार १११ रुपये, उपविजेत्यास ५५ हजार ५५५ रुपये तर तृतीय क्रमांकाच्या संघास ३३ हजार ३३३ रुपये तसेच मॅन ऑफ दि सिरीजला दुचाकी मोटारसायकल आणि दररोज प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ मध्ये एक दुचाकी सायकल अशी भरघोस पारितोषिके आहेत.

या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन गुरुवार दिनांक ०६ फेब्रुवारी सायंकाळी ०४ वाजता होणार असून यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी मंत्री व भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते व कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी,

पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते व नमो चषकचे मुख्य आयोजक परेश ठाकूर, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, शहर अध्यक्ष अनिल भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे. या क्रिकेट सामन्यांच्या यशस्वी

आयोजनासाठी जय्यत तयारी सुरू असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.या स्पर्धेचा क्रिकेटप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन क्रिकेट स्पर्धेचे संयोजक भारतीय जनता पार्टी खारघर व प्रवीण स्पोर्टस वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
