✦ सावित्री महिला मंडळ, संघर्ष युवा मंच व शाखा ८०१ यांच्या वतीने कामोठ्यात डॉ. बाबासाहेबांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनाला भावपूर्ण मानवंदना ✦



कामोठे : 4k News दि. 9
बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ८०१, संघर्ष युवा मंच कामोठे आणि माता सावित्री महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.



सालाबादप्रमाणे यावर्षीही ५ डिसेंबरच्या रात्री सेक्टर-१६ येथील जयभीम स्तंभाजवळ (गोकुळ डेअरी शेजारी) हा कार्यक्रम उत्साहात आणि श्रद्धाभावाने साजरा झाला. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर महिला-पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुले उपस्थित राहून आपल्या मुक्तिदात्याला अभिवादन केले.
कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून विधानपरिषदेचे आमदार विक्रांत दादा पाटील यांनी हजेरी लावून डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले.



कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयु. रमेश गमरे, विनोद गमरे, मंगेश बल्लाळ, अरुण जाधव, आशिष कदम, धर्मदास जाधव, किरण जाधव, शशी चेंदवणकर, आत्माराम कदम, शांताराम यादव, अशोक यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि श्रद्धाभावाने पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top