4kNews कामोठे दि.कु. संस्कार सोमनाथ सूर्यवंशी (इयत्ता १० वी) या विद्यार्थ्याने शाळेमार्फत ‘C.B.S.E. अंडर १७’ च्या बॉक्सिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्याने महाराष्ट्रात दुसरा क्रमांक पटकावला असून, त्याची C.B.S.E. बोर्डातर्फे ‘नॅशनल बॉक्सिंग स्पर्धे’साठी निवड झाली आहे. त्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे चेअरमन श्री. बबनदादा पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी […]
पनवेल तालुक्यात १२ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
पनवेल, दि. 3(वार्ताहर) : पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलप, साईनगर परिसरातून १२ वर्षीय मुलगा घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमती किरणदेवी पिंटू वर्मा (वय ३५, व्यवसाय मजुरी) या साईनगर, वलप, पो. पडघे, ता. पनवेल येथे […]
हलद्वानीतील ‘शुद्धीकरण’ प्रकरणी कारवाई करा; काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
4kNews कामोठे पनवेल, दि. 3(वार्ताहर) : उत्तराखंडमधील हलद्वानी येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या जाहीर सभेनंतर दलित समाजाच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारे कथित ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याचा आरोप करत पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाने संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.याबाबत जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेलचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) पवन […]
सीएसएमटीहून पनवेलमार्गे कोकणासाठी दैनिक रेल्वेसेवेचा शुभारंभ ; शिवसेनेच्या प्रयत्नांना यश
4kNews कामोठे पनवेल, दि.३ (वार्ताहर) : मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभ गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) करण्यात आला. या नवीन रेल्वेसेवेमुळे मुंबई, नवी मुंबईसह कोकणातील प्रवाशांना नियमित प्रवासासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. यासाठी खासदार श्रीरंग बारणे, डॉ.खा.श्रीकांत शिंदे व खा.नरेश म्हस्के यांनी केंद्रातील हि रेल्वे गाडी सुरु होण्यासाठी […]
गुन्हे शाखा कक्ष ३ पनवेल वपोनिपदी औदुंबर पाटील तर पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी सुभाष पुजारी
4kNews कामोठे पनवेल, दि.३ (संजय कदम) : नवीमुंबई पोलीस आयुक्तालय मार्फत अंतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या असून त्यामध्ये गुन्हे शाखा कक्ष ३ पनवेल वपोनिपदी औदुंबर पाटील तर पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी सुभाष पुजारी यांनी आज पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी औदुंबर पाटील हे कार्यरत होते व त्यांनी […]
रिक्षा परमिटसाठी साडेचार हजारांची लाच; आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात खारघर आरटीओ कार्यालयासमोर रंगेहात कारवाई; स्वतःसह लोकसेवकाच्या नावाने लाचेची मागणी
4kNews कामोठे पनवेल, दि. १ (प्रतिनिधी) : रिक्षाचे परमिट नावावर करण्यासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त स्वतःसाठी आणि लोकसेवकाच्या नावाने ४ हजार ५०० रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना आरटीओ एजंट विलास गणपती सनगर (वय ६२) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई पथकाने मंगळवारी रंगेहात ताब्यात घेतले. खारघर आरटीओ कार्यालयासमोरील रस्त्यावर दुपारी १.५६ वाजता ही कारवाई करण्यात आली.तक्रारदार हे […]
तळोजा एमआयडीसीतील खाद्य कंपन्यांना बेकायदेशीर नोटिसा? दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची शिवसेना पनवेल महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश सोमण यांची मागणी
4kNews कामोठे पनवेल, दि.१ (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील तळोजा एमआयडीसी परिसरातील सोनिया फिशरीज, संचिता मरीन, डेन्सन फूड्स आणि विस्टा फूड्स यांसह अनेक खाद्य कंपन्यांना प्रभाग अधिकाऱ्यांकडून चुकीच्या आणि बेकायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्याचा आरोप नगरसेवक तथा शिवसेना पनवेल महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी महापालिका आयुक्त मंगेश चितळे आणि महापौर नितीन […]
संत तुकाराम महाराजांच्या तपोभूमीवरील कथित अवैध उत्खनन थांबवा : मधुसूदन पाटील भामचंद्र-भंडारा डोंगराच्या संरक्षणाची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
4kNews कामोठे मुंबई, दि. १ (प्रतिनिधी) : संत तुकाराम महाराजांच्या साधना व आध्यात्मिक परंपरेशी निगडित पुणे जिल्ह्यातील देहूजवळच्या भामचंद्र-भंडारा डोंगर परिसरातील कथित अवैध उत्खनन, अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे तातडीने थांबवावीत, अशी मागणी संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. तुकयाभक्त मधुसूदन पाटील महाराज यांनी केली. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी […]
शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ मंचाचे राज्यव्यापी आंदोलन; ५ ऑक्टोबरपासून आझाद मैदानात बेमुदत धरणे शाळा-महाविद्यालये बंद करण्याचे निर्णय मागे घेण्यासह केजी ते पीजी मोफत व समान शिक्षणाची मागणी
‘4kNews कामोठे मुंबई, प्रतिनिधी-(अजित मोहिते) दि. १ सप्टेंबर २०२६ : राज्यातील एकही प्राथमिक, माध्यमिक शाळा अथवा महाविद्यालय बंद करू नये, प्रत्येक वर्गाला व प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक उपलब्ध करून द्यावा, तसेच सर्वांना मोफत, गुणवत्तापूर्ण आणि समान शिक्षण मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, महाराष्ट्र’ यांच्या वतीने ५ ऑक्टोबर २०२६ पासून मुंबईतील आझाद […]
संस्कृतीर दिशारीतर्फे ‘मैफिल-ए-अनुराग’चे आयोजन
शास्त्रीय गायन, वादन आणि कथक नृत्याची रंगणार सुरेल मैफल
4kNews कामोठे दि. 1पनवेल (प्रतिनिधी) भारतीय शास्त्रीय संगीत आणि सांस्कृतिक परंपरेचा समृद्ध वारसा जपण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या ‘संस्कृतीर दिशारी’ संस्थेच्या वतीने ‘मैफिल-ए-अनुराग’ या विशेष शास्त्रीय संगीत व नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रेमभावना, अनुराग आणि भारतीय शास्त्रीय संगीत यांचा सुरेल संगम घडविणारी ही विशेष मैफल रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता खारघर […]
