नवीन बातम्या
bbPress: bbPress 2.6.15 is out!
How to Create a WordPress Popup Without a Popup Plugin (Free Method)
रायगड श्रावण सम्राज्ञीच्या इतिहासाच्या पाऊलखुणांसह मराठमोळा श्रावण सोहळा शानदार संपन्न
द एलिट पब्लिक स्कूल (C.B.S.E.), तळोजा या शाळेतील विद्यार्थ्याचे बॉक्सिंग स्पर्धेत सुयश
पनवेल तालुक्यात १२ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
हलद्वानीतील ‘शुद्धीकरण’ प्रकरणी कारवाई करा; काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
सीएसएमटीहून पनवेलमार्गे कोकणासाठी दैनिक रेल्वेसेवेचा शुभारंभ ; शिवसेनेच्या प्रयत्नांना यश
गुन्हे शाखा कक्ष ३ पनवेल वपोनिपदी औदुंबर पाटील तर पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी सुभाष पुजारी
Open Channels FM: Podcasting Meets AI Shifting Formats, Editing, and Ethics

गुन्हे शाखा कक्ष ३ पनवेल वपोनिपदी औदुंबर पाटील तर पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी सुभाष पुजारी

4kNews कामोठे
पनवेल, दि.३ (संजय कदम) : नवीमुंबई पोलीस आयुक्तालय मार्फत अंतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या असून त्यामध्ये गुन्हे शाखा कक्ष ३ पनवेल वपोनिपदी औदुंबर पाटील तर पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी सुभाष पुजारी यांनी आज पदभार स्वीकारला आहे.  


यापूर्वी
पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी औदुंबर पाटील हे कार्यरत होते व त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा पनवेलमध्ये उमटविला होता. त्यांनी शहरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांच्या दुतर्फा होणारे अनधिकृत पार्किंग, वाहतूक नियमांचे उल्लंघन, बेशिस्त रिक्षा पार्किंग आणि अनधिकृत रिक्षा थांबे या समस्यांवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे काम केले होते. तर आता नव्याने पदभार स्वीकारणारे सुभाष पुजारी यांना सुद्धा पनवेल व परिसराचा दांडगा अनुभव असून त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, मुंबई पुणे वाहतूक शाखा आदी ठिकाणी यापूर्वी काम केले आहे. याबरोबरच त्यांनी पोलीस सेवेसोबत शरीरसौष्ठवाची आवड जोपासत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्याने विविध शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. 

त्यांच्या क्रीडा कारकिर्दीत ‘मिस्टर वर्ल्ड’ स्पर्धेत सहा वेळा, ‘मिस्टर एशिया’ स्पर्धेत पाच वेळा आणि ‘मिस्टर इंडिया’ स्पर्धेत पाच वेळा विजेतेपद मिळवल्याची माहिती आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही त्यांनी पदके मिळवली आहेत. त्यांचा पोलीस सेवेचा प्रवास २०११ ते २०१८ या कालावधीत नवी मुंबई पोलीस, पनवेल तालुका, गुन्हे शाखा तसेच उरण आणि नेरुळ पोलीस ठाण्यातून झाला. त्यानंतर २०१९ ते २०२२ या कालावधीत त्यांनी पळस्पे हायवे वाहतूक विभागात सेवा बजावली. २०२३ मध्ये मुंबई शहर पोलीस दलात कार्यरत असताना त्यांनी मानखुर्द आणि मरोळ येथे सेवा बजावली. २०२४ ते २०२६ या कालावधीत डायल ११२ आणि महापे येथे त्यांनी सेवा बजावली. पोलीस सेवेत कार्यरत असतानाच त्यांनी शरीरसौष्ठवाचा सराव कायम ठेवत विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधील त्यांच्या कामगिरीमुळे त्यांनी पोलीस दलासोबतच क्रीडा क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top