नवीन बातम्या
bbPress: bbPress 2.6.15 is out!
How to Create a WordPress Popup Without a Popup Plugin (Free Method)
रायगड श्रावण सम्राज्ञीच्या इतिहासाच्या पाऊलखुणांसह मराठमोळा श्रावण सोहळा शानदार संपन्न
द एलिट पब्लिक स्कूल (C.B.S.E.), तळोजा या शाळेतील विद्यार्थ्याचे बॉक्सिंग स्पर्धेत सुयश
पनवेल तालुक्यात १२ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
हलद्वानीतील ‘शुद्धीकरण’ प्रकरणी कारवाई करा; काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
सीएसएमटीहून पनवेलमार्गे कोकणासाठी दैनिक रेल्वेसेवेचा शुभारंभ ; शिवसेनेच्या प्रयत्नांना यश
गुन्हे शाखा कक्ष ३ पनवेल वपोनिपदी औदुंबर पाटील तर पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी सुभाष पुजारी
Open Channels FM: Podcasting Meets AI Shifting Formats, Editing, and Ethics

हलद्वानीतील ‘शुद्धीकरण’ प्रकरणी कारवाई करा; काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

4kNews कामोठे
पनवेल, दि. 3(वार्ताहर) : उत्तराखंडमधील हलद्वानी येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या जाहीर सभेनंतर दलित समाजाच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारे कथित ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याचा आरोप करत पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाने संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेलचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) पवन चांडक यांना निवेदन दिले. निवेदनात हल्द्वानी येथे मल्लिकार्जुन खरगे यांच्या जाहीर सभेनंतर गंगाजल व गोमूत्र शिंपडून ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.


खरगे हे दलित समाजाचे असल्याने त्यांच्या सभेच्या ठिकाणी अशा प्रकारे ‘शुद्धीकरण’ करणे हे अत्यंत निंदनीय, जातीय व भेदभावपूर्ण कृत्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध करत संबंधित व्यक्तींविरोधात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ अंतर्गत तात्काळ कारवाई करून एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत लोखंडे, जिल्हा सरचिटणीस सुधीर कासारे, जिल्हा सचिव विद्या रवींद्र कांबळे, जिल्हा सचिव अशोक बनसोडे, जिल्हा सचिव देवेंद्र निकम आणि जिल्हा उपाध्यक्ष सुरेश थोरात यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top