नवीन बातम्या
पनवेलमध्ये डेंग्यू-मलेरियाचा वाढता धोका; स्वाईन फ्लूबाबतही चिंता शिवसेना शिष्टमंडळाचे आरोग्य विभागाला १५ सप्टेंबरपर्यंत उपाययोजनांचे अल्टिमेटम
डान्सबारच्या मुद्द्यावर पनवेलच का लक्ष्य?
परिमंडळ १ व २ मधील बारच्या वेळांवरही प्रश्नचिन्ह; केवळ पनवेलचे नाव चर्चेत आणण्यामागे ‘बोलविता धनी’ कोण?
केएमबी ग्लोबल ह्युमॅनिटी फाउंडेशनचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम ;
१०० गरजू कुटुंबांना रेशन, १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; २०० महिलांना साड्यांचे वाटप
टाटा स्टील स्थानिकांना रोजगार पुरवण्यासाठी आणि कामगारांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर
उरण, रायगडचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांना अभियांत्रिकी विषयात पीएच.डी.
नागाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी १२ कोटींहून अधिक गैरव्यवहाराचा संघर्ष समितीचा आरोप; २ सप्टेंबरला पंचायत समितीवर मोर्चाचा इशारा
खारघरमधील SIR प्रकरणाची व्याप्ती वाढली; पाच BLO निलंबित
प्रभाग १४ मध्ये आयुष्मान, आभा कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुष्पकनगर परिसरात इसमाचा मृतदेह आढळला

चालत्या मोटर सायकलवरून महिलांचा विनयभंग करणाऱ्या विकृत इसमास अटक

4kNews
पनवेल ,दि.२९ ( संजय कदम ) : चालत्या मोटर सायकलवरून महिलांचा विनयभंग करणाऱ्या विकृत इसमास रबाळे पोलिसांनी अटक केली आहे .   एक २२ वर्षीय तरुणी तिच्या मैत्रिणीच्या घरी जात असताना सेलिब्रेशन बिल्डिंगच्या मागील गेटसमोर, सेक्टर 06, ऐरोली,  येथे आल्या असता आरोपीने त्याच्याजवळ असलेल्या बर्गमन कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या स्कुटीवरून फिर्यादीचा पाठलाग करून त्यांच्या विनयभंग करण्याच्या उद्देशाने त्यांच्या पाठीमागील पार्श्वभाग पकडून दाबून तेथून पळ काढला. 

त्यानंतर फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर गुन्हा दाखल करण्यात आला व त्यानुसार वपोनि  बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन गवळी (गुन्हे) व पोलीस निरीक्षक श्याम बनसोडे (प्रशासन) यांच्यासह सपोनि अविनाश पाळदे,पोउनि राहुल गरड,पोहवा दर्शन कटके,  पो हवा वायंगणकर, पोहवा मयूर सोनवणे, पोशि मनोज देडे व पोशि यादवराव घुले या पथकाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळावरील प्राथमिक माहिती घेतली. घटनास्थळाचे प्राप्त सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास तसेच गुप्त बातमीदारामार्फत आरोपीचा शोध घेऊन आरोपी  कृष्णा महेंद्र कनोजिया, वय 21 यास  ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top