नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यात हिंमत आहे म्हणूनच त्यांनी करून दाखवले – काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत

पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक बांधिलकीतून लोकनेते रामशेठ ठाकूर सतत काम करत असतात. त्यामुळे त्यांना सर्व समाजात मानणारा मोठा वर्ग आहे. ते या भूमीत जन्मले आणि त्यांनी येथील प्रत्येक माणसाचा विचार करत या भूमीचा उद्धार केला त्यामुळे त्यांचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर स्थानिकांच्या हक्कासाठी लढणारे नेते आहेत, त्यामुळे उलवा नोड मध्ये उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या अनुषंगाने येथील मैदान लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने ओळखले जाणार असून येथील शिवसृष्टी आणि मैदान विभागाच्या नावलौकिकात भर टाकणारे ठरणार आहे, असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीचे सरचिटणीस, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व कामगारनेते महेंद्र घरत यांनी आज (दि. ०६) शेलघर येथे केले.


         मुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवे नोडमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, मैदानाचा विकास आणि त्या अनुषंगाने शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच सुरुवात होणार असून १९ फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची नियोजन आढावा बैठक समितीचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.


       या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भाऊशेठ पाटील, वसंत म्हात्रे, वसंत पाटील, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, विश्वनाथ कोळी, अमर म्हात्रे, माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, सागर ठाकूर, सचिन घरत, हेमंत ठाकूर, अमृत भगत, व्ही. के.ठाकूर, किसन पाटील, गजानन घरत, सचिन पाटील, सी.एल. ठाकूर, भार्गव ठाकूर, अनंत ठाकूर, अशोक कडू, उषा देशमुख, कामिनी कोळी, सुजाता पाटील, योगिता भगत, मिनाक्षी पाटील, सुधीर ठाकूर, दर्शन ठाकूर, सुजित ठाकूर, रघूनाथ देशमुख, अनुप भगत, प्रमोद कोळी, गोपी भोईर, महादेव कोळी, भाऊ भोईर, भगवान कोळी, वामन ठाकूर, बाळकृष्ण कोळी, राजकिरण कोळी, विनायक कोळी, वैभव घरत, कमलाकर देशमुख, रोशन म्हात्रे, प्रमोद कोळी, संकल्प घरत, काशिनाथ पाटील, किशोर पाटील, मनोज कोळी, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


        महेंद्र घरत यांनी पुढे बोलताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ आणि प्रेरणादायी पुतळा उभारण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरु होता. त्याच अनुषंगाने या ठिकाणी असलेल्या मैदानाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव देण्याचा ठराव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेऊन तो पारीतही केला.

आता या मैदानाचे नामकरण शिवजयंतीच्या पवित्र दिवशी होणार आहे.  घरत यांनी पुढे म्हंटले की, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रत्येक समाजात कार्य आहे. या विभागाचे ते आधारस्तंभ आहेत. त्यांनी गरजेपोटी घरे नियमित करणे, १९८४ चा आंदोलन, साडेबारा टक्के लढा, जेएनपीटी लढा असो व येथील भूमिपुत्रांचे प्रश्न असो ते मार्गी लावत तसेच सढळ हस्ते मदत करत समाजाला मोठा आधार दिला आहे. लोकनेते रामशेठ मोठ्या उंचीचे व्यक्तिमत्व आहेत त्यामुळे राजकीय चपला बाजूला सारून ते समाजासाठी काम करत असतात. या भागाचा विकास झाला आहे तो त्यांच्या दूरदृष्टीतून आणि प्रयत्नातूनच कारण लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यात हिंमत आहे म्हणूनच त्यांनी ते करून दाखवलं आहे, असेही घरत यांनी म्हंटले. १९ फेब्रुवारीला शिवजयंतीचा कार्यक्रम मोठा झाला पाहिजे यासाठी तयारी सुरु असून या कार्यक्रमाचे महत्व जाणून घेत परदेशात होणाऱ्या कामगारांच्या बैठकीला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top