नवीन बातम्या
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.

ओरायन  मॉल मध्ये असंभव चे विशेष प्रीमियर; शहरातील प्रतिष्ठित मंडळींची मोठी उपस्थिती

4k समाचार
पनवेल दि. २७ ( वार्ताहर ) : पनवेल शहरातील एकमेव मॉल असलेल्या ओरायन मॉल मध्ये असंभव या मराठी चित्रपटाचे विशेष प्रीमियर मोठ्या उत्साहात पार पडले.यावेळी असंभव चित्रपटाची स्टारकास्टसह पनवेल शहरातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती.मराठी अभिनेत्यांना पाहण्यासाठी शहरात मोठी गर्दी झाली होती. 


ओरायन मॉलचे मालक चित्रपटाचे सहनिर्माते मंगेश परुळेकर ,शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक संजय पोतदार हे या चित्रपटाचे सहनिर्माते यावेळी उपस्थित होते.यांच्यासह अभिनेते सचित पाटील,पुष्कर क्षोत्री,मुक्ता बर्वे,नितीन वैद्य,तेजस देसाई,शर्मिष्ठा राऊत आदींसह या प्रीमियरला आ.प्रशांत ठाकुर,आ.विक्रांत पाटील,भाजप नेते बाळासाहेब पाटील,माजी सभागृह नेते परेश ठाकुर,शिंदे सेनेचे नेते चंद्रशेखर सोमण,मा. नगरसेवक अनिल भगत, उद्योजक विजय लोखंडे आदींसह शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.यावेळी पनवेलकरांसाठी असंभव चित्रपटाचे विशेष शो चे देखील आयोजन करण्यात आले होते.या शोला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.चित्रपटाच्या स्टारकास्टने यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.या चित्रपाटाचा गोवा येथे होणाऱ्या इफ्फि 2025 आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाल्याने देखील उपस्थितांनी चित्रपटाच्या स्टारकास्ट आणि निर्मात्यांचे अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top