नवीन बातम्या
उरण नगरपरिषदेत वारस हक्काने १९ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती. २ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांच्या प्रयत्नामुळे मार्गी.
*सरगम लायन्स तर्फे तळोजा प्राथमिक शाळेत वाचनालय*
अभिनेते विकास वायाळ यांची दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या महाराष्ट्र प्रवक्तापदी निवड
क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांचा रोटरीतर्फे सन्मान
शिक्षक-पालक संघाची स्थापना; मानसी कोकीळ, मनीषा पाटील अध्यक्ष
पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
सिडको अग्निशमन केंद्र खारघर  रेस्क्यू  वर्दी
संतोष पवार यांची पनवेल शहर जिल्हा काँग्रेस एससी विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन

नवी मुंबईत किरकोळ वादातून सलून कारागिरावर लोखंडी रॉडने हल्ला


4kNews दि. 9
नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर-4A येथे केवळ नाकातील केस कापण्याच्या किरकोळ कारणावरून सलून कारागिरावर बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश पार्टे हा इतरत्र केस कापून सुजय पाटील यांच्या सलूनमध्ये आला. त्याने तेथील कारागीर असू खान यांना नाकातील केस कापून देण्याची मागणी केली. यावर खान यांनी, “जिथे केस कापले तिथेच जा आणि तिथेच नाकातील केसही कापून घ्या,” असे सांगताच आरोपी संतापला. 



वाद वाढताच गणेश पार्टे याने असू खान यांना प्रथम हाताने व नंतर लोखंडी रॉडने मारहाण केली. या हल्ल्यात असू खान जखमी झाले असून त्यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कोपरखैरणे पोलिसांनी गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top