
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आज लागलेल्या निकालांमध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये महायुती 229 जागांवर आघाडीवर आहे. त्यामध्ये भाजपाला तब्बल 133 जागांवर आघाडी मिळाली आहे.

दरम्यान, या विजयानंतर भाजपाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावूक प्रतिक्रिया दिली आहे.
