पनवेल, दि.25 (4kNews) ः कामोठे बाजूकडून अलिबागकडे जाणार्या एका गाडीने पनवेल जवळील तक्का येथील उड्डाण पुलावर अचानकपणे पेट घेवून काही क्षणातच ही गाडी आगीच्या भस्मसात झाली. सुदैवाने गाडीतील दोघेही बचावले आहेत.

कामोठे येथून अलिबाग येथील आपल्या घरी राणे व त्यांचे सहकारी हे आज सायंकाळी जात असताना अचानकपणे तक्का येथील उड्डाण पुलावर गाडीमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने त्यांनी गाडी बाजूला घेतली व ते गाडी बाहेर येवून आग विझविण्याचा प्रयत्न करीत असताना गाडीने अचानकपणे पेट घेतला व काही वेळातच ही गाडी आगीत भस्मसात झाली. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
