पनवेल,दि.04: पनवेल महानगरपालिकेच्यावतीने अतिक्रमण विभागांतर्गत प्रभाग कार्यालयाच्यावतीने गेल्या दोन दिवसापासून हातगाड्यांवर तसेच अनधिकृत्या बांधलेल्या झोपड्या, दुकानांबाहेर अनधिकृतरित्या ठेवलेल्या सामानांवर आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या निर्देशानूसार तोडक कारवाई करण्यात येत आहे. फूटपाथवर तसेच रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे महापालिकेच्यावतीने ही कारवाई करण्यात आली.
शहरातील हातगाड्यांमुळे वाहतुकीला अडथळे होत असल्याने मंगळवार दिनांक 3 डिसेंबर रोजी कळंबोली मध्ये सुमारे 12 हातगाड्यांवरती तोडक कारवाई करण्यात आली. तसेच पनवेल प्रभाग ‘ड’ मधील उरण नाका येथील 7 हातगाड्यांवर जप्त करून तोडण्यातआल्या.

अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यांवरून जाण्यायेण्यास त्रास होत असल्याने नागरिकांच्या आलेल्या तक्रारीनूसार आयुक्त श्री. मंगेश चितळे यांनी अतिक्रमणावरती कडक कारवाई करण्याचे आदेश चारही प्रभाग कार्यालयास दिले आहेत. त्यानूसार आज दिनांक 4 डिसेंबर रोजी खारघरमध्ये सेक्टर 12 येथे अनधिकृतरित्या वसवलेल्या झोपडपट्टीवरती तोडक कारवाई करण्यात आली. याबरोबरच पनवेलमध्ये लाईन आळीमध्ये दुकानदारांनी दुकानाबाहेर ठेवलेल्या सामानांवर जप्तीची कारवाई करण्यात आली.

प्रभाग ‘क’ कामोठे मध्ये फूटपाथवरती दुकानदारांनी ठेवले दुकानाचे बोर्ड काढून नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ रिकामे करण्यात आले. प्रभाग ‘ब’ कळंबोलीमध्ये फूटपाथवरती अनधिकृतरित्या उभारलेले सरबताचे स्टॉल्स इतर स्टॉल्सवरती तोडक कारवाई करण्यात आली.
