Tag: #4kChannel

कंपनी सेक्रेटरी परीक्षेत विश्वेश सहस्रबुद्धे यांचे घवघवीत यश

4kNews कामोठे दि 30 कंपनी सेक्रेटरी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून संपूर्ण भारतात १२ वा क्रमांक मिळवणाऱ्या पनवेलचे सुपुत्र श्री. विश्वेश अविनाश सहस्रबुद्धे यांचा गौरव रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला.या भव्य सत्कार सोहळ्यात पालकमंत्र्यांनी विश्वेश यांच्या परिश्रम, चिकाटी आणि ध्येयवेडाचे कौतुक करताना सांगितले की, “अशा तरुणांच्या यशामुळे समाजात प्रगतीची दिशा […]

WDS ‘फाइट नाईट 18’साठी सज्ज; भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय फायटर्सशी लढत

4kNews कामोठे मुंबई, दि. २८ :  बातमी प्रीतिनिधी अजित माहिते भारतातील वेगाने विस्तारत असलेल्या MMA (मिक्स्ड मार्शल आर्ट्स) स्पर्धा **‘वॉरियर्स ड्रीम सिरीज’ (WDS)**च्या ‘फाइट नाईट 18’चे आयोजन २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील CIDCO एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारतासह फिलिपिन्स आणि रशियातील खेळाडू सहभागी होणार आहेत. ‘फाइट नाईट 18’मध्ये एकूण १३ […]

कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोषची सुवर्ण झेप लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार; ५० हजार रुपयांचे बक्षीस

4kNews कामोठे पनवेल, दि. २७ (प्रतिनिधी) : कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका संदीप घोष हिने सुवर्णपदक पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाचा सत्कार करून तिला ५० हजार रुपयांचे बक्षीस दिले. स्वस्तिका ही न्यू पनवेल येथील चांगू […]

पत्रकारांनी घेतली पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची भेट बहुउद्देशीय पत्रकार भवनासाठी भूखंडाची मागणी

4KNews कामोठे कळंबोली, दि. २७ (वार्ताहर) : रायगडचे पालकमंत्री तथा महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांची पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल येथे भेट घेतली. यावेळी पनवेल तालुक्यात प्रस्तावित असलेल्या बहुउद्देशीय पत्रकार भवनासाठी शासकीय भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे निवेदन मंचाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते पालकमंत्र्यांना देण्यात आले. पनवेल तालुका पत्रकार विकास मंच […]

कळंबोलीतील वाहतूक कोंडीबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वाहतूक शाखेला निवेदन

4kNews कामोठे पनवेल,  दि. २७ (वार्ताहर) : कळंबोली परिसरातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून, या प्रश्नावर वाहतूक विभागाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कळंबोली विभागातर्फे करण्यात आली आहे. विभागप्रमुख विश्वास पेटकर यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक करण […]

आकाशाची राणी’ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर; पहिल्या बोईंग ७४७ मालवाहू विमानाचे आगमन
‘क्वीन ऑफ द स्काइज’चे नवी मुंबईत पदार्पण; मुंबईच्या हवाई मालवाहतुकीला नवी दिशा

‘ 4kNews कामोठे दि. 27पनवेल (प्रतिनिधी ) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई मालवाहतूक सेवेच्या विस्तारात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. नॅशनल एअरलाइन्सचे बोईंग ७४७ एफ मालवाहू विमान जर्मनीतील फ्रँकफर्ट-हॅन या प्रमुख युरोपीय मालवाहतूक केंद्रावरून नवी मुंबई विमानतळावर दाखल झाले. नवी मुंबई विमानतळावर दाखल झालेले हे पहिले बोईंग ७४७ मालवाहू विमान ठरले आहे.     […]

३० ऑगस्टला पनवेलमध्ये माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे विशेष व्याख्यान

4kNews कामोठे दि. 27 पनवेल (प्रतिनिधी) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग, तालुका विधी सेवा समिती, पनवेल आणि पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओक यांचे विशेष व्याख्यान व मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आद्य क्रांतिवीर […]

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी शिवसेना पनवेलतर्फे मोफत बस सेवा

4kNews कामोठे पनवेल, दि.२६ (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या निमित्ताने तसेच शिवसेना नगरसेवक तथा महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पनवेलच्या वतीने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १२ सप्टेंबर रोजी पनवेलहून कोकणातील विविध ठिकाणी या बस रवाना होणार आहेत. यामध्ये राजापूर (पाली, लांजा मार्गे), रत्नागिरी (संगमेश्वर), चिपळूण, खेड आणि दापोली […]

रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठानतर्फे महिलांचा मंगळागौर सोहळा उत्साहात

4kNews कामोठे पनवेल, दि.२६ (वार्ताहर) : रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करंजाडे येथे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला मंगळागौर सोहळा उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडला. महिलांनी पारंपरिक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध कलाविष्कार सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाच्या तयारीसाठी महिलांनी सुमारे महिनाभर नियमित सराव केला होता. त्यांच्या मेहनतीचे आणि उत्स्फूर्त सहभागाचे रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठानचे सरचिटणीस […]

श्रावण क्वीन २०२६’ स्पर्धेत रियांका वैभव मालुसरे प्रथम

4kNews कामोठे पनवेल, दि. २६ (वार्ताहर) : साहस फाउंडेशनच्या अध्यक्षा रेश्मा कुरूप यांच्या पुढाकाराने पनवेल येथील चंदूकाका सराफ येथे ‘श्रावण क्वीन २०२६’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या कलागुणांना, आत्मविश्वासाला आणि व्यक्तिमत्त्वाला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.स्पर्धेत रियांका वैभव मालुसरे यांनी प्रथम क्रमांक पटकावत ‘श्रावण क्वीन २०२६’चा मान […]

Back To Top