पनवेल, दि.8 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटीलांची बैठक घेवून त्यांना नवीन कायद्याविषयी मार्गदर्शन वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कांबळे यांनी केले. यावेळी अधिकारी वर्गांनी उपस्थित पोलीस पाटीलांना आवश्यक त्या सुचना देताना सांगितले की, आगामी सण उत्सव कार्यक्रमांबाबत आगाऊ माहिती पोलीस ठाणे देणे, विनापरवाना राहणारे परदेशी नागरिकांची माहिती, […]
आमदार प्रशांत ठाकूर सदगुणी आमदार- वनमंत्री गणेश नाईक
पनवेल (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर ठामपणे बोलतात आणि असे असतानाही त्यांच्यामध्ये कुठलाही अहंकार नाही त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर “सदगुणी आमदार” आहेत, असे गौरवोद्गार राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी खारघर येथे नमो चषक क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटनाप्रसंगी केले. लोकनेते रामशेठ ठाकूर जनहितासाठी नेहमी पुढाकार घेतात आणि त्यांच्या मुलांवर उत्तम संस्कार असल्याने आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर […]
*शनिवारपासून खानाव येथे ‘आमदार चषक’ प्रकाशझोतातील टेनिस क्रिकेट स्पर्धा*
पनवेल (प्रतिनिधी): तालुका भाजपचे उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आमदार चषक’ प्रकाशझोतातील टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन खानाव येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दिनांक ०८ ते मंगळवार ११ फेब्रुवारीपर्यंत रंगणार आहे. स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते […]
डिस्टन्स इलेव्हनने पटकावले नमो चषक व्हॉलीबॉल विजेतेपद
पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक २०२५ आयोजित करण्यात आला असून त्या अंतर्गत कामोठे येथे झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचा विजेतेपद डिस्टन्स इलेव्हन या संघाने पटकावले. उपविजेते केवायसी इलेव्हन, तृतीय क्रमांक आयांश इलेव्हन तर चतुर्थ क्रमांक संघ इलेव्हन संघाने पटकाविला. विजेत्या संघाला १५ हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला […]
रविवारी कळंबोलीत कुस्त्यांचा आखाडा
पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक २०२५ अंतर्गत रविवार दिनांक ०९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०४ वाजता कळंबोली […]
रविवारी कामोठेत नमो चषक फुटबॉल स्पर्धा
पनवेल (प्रतिनिधी) उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केसात आलेल्या नमो चषक २०२५ क्रीडा महोत्सव अंतर्गत रविवार दिनांक ०९ फेब्रुवारीला सायंकाळी ०४ वाजता […]
प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संघटन पर्व आढावा बैठक संपन्न
पनवेल (प्रतिनिधी) उरण विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संघटन पर्व आढावा बैठक पनवेल शहरातील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरुवारी झाली. या बैठकीत रवींद्र चव्हाण यांनी उरण परिसरात सुरु असलेल्या सदस्यता नोंदणीचा आढावा घेत सदस्यता मोहिमेला अधिक गती देण्याच्या दृष्टीने प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने गावागावात […]
यामहा स्कुटीची डिलेव्हरी इच्छित स्थळी न करता मालकाची करणार्या आरोपीस अटक
पनवेल, दि.7 (संजय कदम) ः यामहा रे कंपनीच्या स्कुटीची डिलेव्हरी कोईंबत्तुर येथे न करता कुरिअरच्या वाढीव पेमेंटकरिता तसेच मालाच्या इन्शुरन्स करिता व गोडावूनचे भाडे वगैरे करता वेगवेगळ्या कारणाने पैसे मागणार्या डिलेव्हरी कंपनीविरोधात संबंधित गाडीच्या मालकाची फसवणूक करणार्या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे ताब्यात घेवून अटक केली आहे. आर.रेवती यांच्या तक्रारीनुसार त्यांचे पती हे […]
*महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय आणि 100 दिवस कृती आराखड्या अंतर्गत पनवेल तालुका पोलिसांनी केले मार्गदर्शन*
पनवेल दि.०७(संजय कदम ): महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय आणि 100 दिवस कृती आराखड्या अंतर्गत पनवेल तालुका पोलिसांनी केले मार्गदर्शन उपक्रम राबवला होता. त्यानुसार पनवेल तालुक्यातील नेरे आणि शेडुंग येथे मार्गदर्शन कार्यक्रम राबवण्यात आला. महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय आणि 100 दिवस कृती आराखड्यातील सुकर जीवनमान या विषयांतर्गत पोलीस आयुक्त नवी मुंबई यांचे आदेश व निर्देशाप्रमाणे […]
“काळजी घ्या” हा रस्ता सुरक्षते विषयी प्रबोधनात्मक कार्यक्रम*
पनवेल : आरटीओ पनवेल,महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना, ओमकार मोटर ट्रेनिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०२५ चे औचित्य साधून “काळजी घ्या” हा रस्ता सुरक्षते विषयी प्रबोधनात्मक कार्यक्रम ओमकार मोटर ट्रेनिंग स्कूल कामोठे येथे घेण्यात आला. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आमदार विक्रांत पाटील साहेब, ARTO निलेश धोटे, नांदकर, अशोक वारे, काकडे, विजया चामे, […]
