नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

Tag: #vidhansabhanivdnuk2024

रायगड जिल्ह्यात भाजप सदस्य नोंदणीचा शुभारंभ

पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या घटनेनुसार दर सहा वर्षांनी आपली सदस्यत्वता नूतनीकरण करण्यात येते. त्यानुसार भाजपने संपूर्ण देशभरात सदस्य नोंदणी अभियान सुरु केले आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील नोंदणी अभियानाचा औपचारिक शुभारंभ भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार संजय केळकर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सदस्य नोंदणीने झाला. नागपूर येथे भाजपा प्रदेश बैठक आणि सदस्य नोंदणी […]

स्वर्गीय माता बहिणाबाई व स्व पिता स्व.उकर्डाजी दुधे यांच्या पुण्यतिथी निमित्त वृद्धांना भोजनदान व ब्लँकेट वाटप

पनवेल, दि.25 (4kNews) ः पनवेल नवी मुंबई चे प्रसिद्ध उद्योगपती महाराष्ट्रीयन बिल्डरचे सरचिटणीस  तुकाराम दुधे यांनी आपल्या माता पित्याच्या पुण्यतिथी निमित्त बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी घरी पूजा अर्चना करून  नेरा येथील स्नेहकुंज आधारगृह मधील वृद्धांना भोजनदान  व ब्लँकेट वाटप करण्यात आले  या कार्यक्रमाला दुधे परिवारातील तुकाराम दुधे त्यांची बहीण मेव्हणे पत्नी सुरेखा दुधे […]

पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे बेकायदेशीररित्या नारळपाणीसह फळ विक्री करणार्‍यांना अभय

पनवेल, दि.25 (4kNews) ः परराज्यातून आलेल्या व पनवेल शहरासह नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, खारघर, कळंबोली आदी विभागात बेकायदेशीररित्या नारळ पाणी तसेच फळ विक्री करणार्‍या परप्रांतीयांवर पनवेल महानगरपालिका अतिक्रमण विभाग का कारवाई करत नाही, असा सवाल येथील स्थानिक रहिवाशी करीत आहेत. शहरातील उपजिल्हा रुग्णालय परिसरात, तालुका पोलीस स्टेशन समोर, तहसील कार्यालयाजवळ शहरातील विविध रुग्णालये, नारायण […]

कळंबोली  येथे सांताक्लॉज द्वारेवाहन चालकांना वाहतुकीचे धडे दिले तसेच वाहन चालकांना चॉकलेट वाटपही केले

आज रोजी कळंबोली वाहतूक शाखेच्या वतीने 10.30कळंबोली सर्कल या ठिकाणी वाहतूक नियमन करण्यासाठी सांताक्लॉज ला पाचारण करण्यात आले त्याद्वारे वाहन चालकांना वाहतुकीचे धडे दिले तसेच वाहन चालकांना चॉकलेट वाटपही केले आणि वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जनजागृती केली. सदर वेळी असंख्य वाहन चालक हजर होते

महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ‘रामबाग’ उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा

पनवेल (हरेश साठे) महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील ‘रामबाग’ या अतिसुंदर उद्यानाचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा हजारों नागरिकांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात रविवारी सायंकाळी साजरा झाला.   नयनरम्य वातावरण, आकर्षक विद्युत रोषणाई, उत्तम नियोजन आणि लहानग्यांपासून युवक, महिला, ज्येष्ठांची उपस्थितीने रामबाग नंदनवन प्रमाणे फुलले होते. आणि त्यातच पारंपरिक […]

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा; बुधवारपासून रायगड केंद्राची प्राथमिक फेरी; मुंबई, ठाणे, कल्याण व इतर केंद्राची प्राथमिक फेरी २६ ते २९ डिसेंबरपर्यंत होणार

पनवेल (प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदा ११ वे वर्ष असून  त्या अंतर्गत रायगड केंद्राची प्राथमिक फेरी २५ डिसेंबर रोजी, तसेच मुंबई, ठाणे, कल्याण व इतर केंद्राची […]

करंजाडे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन होण्यासाठी सिडकोकडे पाठपुरावा करणार ः खा.श्रीरंग बारणे

पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः करंजाड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन होण्यासाठी सिडकोकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्‍वासन आज प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या भेटीमध्ये खा.श्रीरंग बारणे यांनी दिले. प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने करंजाडे मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन व्हावे यासाठी सतत पाठपुरावा करत असून यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघातील  खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची पनवेल येथे भेट […]

महिलेची हत्या करून जबरी चोरी करणार्‍या आरोपीस गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल यांनी ठोकल्या बेडया

पनवेल, दि.23 (4kNews) ः एका महिलेची हत्या करून जबरी चोरी करणार्‍या आरोपीस अडीच महिन्यानंतर गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने अथक मेहनत घेवून ताब्यात घेतल्याने या खुनाची उकल झाली आहे. सदर घटना ही पनवेल तालुक्यातील वलप गावामध्ये घडली होती. पनवेल तालुका पोलीस ठाणे हदिद्तील वलप गावातील महिला सौ.संगिता राजेंद्र आगवणे, वय 49 वर्षे हया दिनांक […]

दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था दिव्यांग दिन सोहळा संपन्न

पनवेल, दि.23 (4kNews) ः दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेतर्फे आज जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून पनवेल शहरातील पनवेल महानगरपालिका, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दिव्यांग दिन सोहळा मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमाद्वारे संपन्न झाला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी.जी.पाटील, नायब तहसीलदार विनोद लचके, संघटना सचिव राजाराम गोरे, सल्लागार वाशीकर, मनसेचे प्रवक्ते योगेश […]

बडोदा मुंबई महामार्गाच्या माथेरान डोंगरातील दुसर्‍या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याने 25 जुलै पर्यंत हा मार्ग खुला होण्याची शक्यता

पनवेल, दि.23 (4kNews) ः बडोदा मुंबई महामार्गाच्या शेवटच्या पॅकेजमधील माथेरान डोंगर रांगांखालील शिरवली गावालगतचा पहिल्या बोगद्याचे खोदकाम ऑगस्ट महिन्यात आरपार झाल्यानंतर दूसरा बोगद्याचे खोदकाम कधी पुर्ण होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दुसर्‍या बोगद्याचे खोदकाम आरपार झाल्याची माहिती मिळत असून सध्या या मार्गावर युद्धपातळीवर रस्त्याचे बांधकाम सुरु असून जुलै 2025 पर्यंत हे काम पुर्ण करण्याच्या […]

Back To Top