नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Tag: #vidhansabhanivdnuk2024

नवनिर्वाचित आ.विक्रांत पाटील यांनी प्रथमच अधिवेशन दरम्यान पनवेलकरांच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्‍न मांडला विधानभवनात

पनवेल, दि.17 (4kNews) ः आमदार म्हणून संधी मिळाल्या नंतर आज प्रथमच अधिवेशना दरम्यान विधान भवनात नवनिर्वाचित आ.विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी पनवेलकरांच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्‍न विधानभवनात मांडला आहे. यावेळी आ.विक्रांत पाटील यांनी प्रश्‍न मांडताना सांगितले की, पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांची पाण्याची गरज भागविताना महानगरपालिकेला अनेक अडचणी निर्माण होत आहे. सध्याची पाण्याची मागणी प्रतिदिन 259 द.लि.लि. प्रतिदिन […]

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड  
सरचिटणीसपदी हरेश साठे, उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील तर खजिनदारपदी संजय कदम  

( 4kNews कामोठे )पनवेल पत्रकारिता क्षेत्रासोबत सातत्याने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणार्‍या पनवेल तालुका विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.पनवेल तालुका पत्रकार विकास मंचची वार्षिक सर्वसाधारण बैठक मंचाचे सल्लागार ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील आणि अविनाश कोळी व मावळते अध्यक्ष विवेक पाटील यांच्या प्रमुख  उपस्थितीत पार पडली. यावेळी सन 2025  सालाकरिता […]

मौजे वावंजे, ता.पनवेल स.नं.123/2 या या कॉरिडोअर महामार्ग वसई-विरार-पनवेल-अलिबाग संपादीत जमिनीच्या खरेदीखत दस्त व्यवहारात फसवणूक झाल्याने न्याय देण्याची शेतकर्‍याची मागणी

(4kNews कोमोठे ) ः पनवेल तालुक्यातील मौजे वावंजे, ता.पनवेल स.नं.123/2 या या कॉरिडोअर महामार्ग वसई-विरार-पनवेल-अलिबाग संपादीत जमिनीच्या खरेदीखत दस्त व्यवहारात फसवणूक झाल्याने न्याय देण्याची आज मागणी पनवेल शहरातील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालयासमोरील प्रांगणात घेतलेल्या 11 व्या पत्रकार परिषदेमध्ये फसवणूक झालेले शेतकरी नामदेव शंकर गोंधळी यांनी केली आहे.  यावेळी बोलताना फसवणूक झालेले शेतकरी नामदेव गोंधळी […]

पनवेल शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे रिक्षात विसरलेली सोन्याच्या दागिन्यांची पिशवी महिलेला मिळाली परत

पनवेल, दि.16 (4kNews) ः पनवेल शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे रिक्षा प्रवासादरम्यान रिक्षात विसरलेली सोन्याच्या दागिन्यांची पिशवी महिलेला पोलिसांनी परत मिळवून दिली आहे. वत्सला राम पकडे (रा. घोट गाव) या खरेदी करता घोट गाव ते पनवेल भाजी मार्केट असा रिक्षाने प्रवास करताना त्यांच्यासोबत त्यांच्या घरातील अन्य चार महिला असे रिक्षामध्ये बसून महाराष्ट्र बँक, ओल्ड पनवेल समोर उतरल्या […]

तीन इसमांकडून दोन लोंखडी अग्निशस्त्र ( पिस्टल ) व एक जिवंत काडतुस हस्तगत केले नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने ; 1 आरोपी फरार

पनवेल, दि.16 (4kNews) ः पनवेल तालुक्यातील नेरे परिसरातून नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तीन इसमांकडून दोन लोखंडी अग्नीशस्त्र (पिस्टल) व एक जीवंत काडतुस हस्तगत केले असून त्यांचा चौथा साथीदार पसार झाला आहे. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे पोलीस हवालदार अनिल मांडोळे यांना त्याचे गोपनिय बातमीदारा मार्फत, संशयीत इसम हे हॉटेल न्यु रॉयल कॅफे […]

परभणी येथील घटनेचा वंचित बहुजन आघाडीने केला निषेध

पनवेल, दि.15 (4kNews) ः परभणी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जवळ असलेल्या भारतीय संविधानाच्या शिल्पाची विटंबना करण्यात आली या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी करंजाडे शहर च्या वतीने आज पनवेल शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. यावेळी पनवेल तालुका वंचित बहुजन आघाडी महिला अध्यक्षा कु. रोहिणीताई खरात, आयु. स्वप्नील पवार (अध्यक्ष – […]

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान.. कोपर येथे मोठया उत्साहात दत्त जयंती साजरी

पनवेल/प्रतिनिधी — ‘दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात शहरातील विविध दत्त मंदिरांत जयंती उत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने कोपर येथील आर 4 येथील बळीराम धर्मा पाटील व शंकर धर्मा पाटील यांच्या दत्त मंदिरामध्ये सकाळपासून रांगा लागल्या होत्या. यावेळी पाटील परिवाराकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दत्त जयंतीनिमित्त कोपर येथील प्लॉट 221 आर 4 येथील अपेक्स […]

माजी नगरसेवक विकास घरत यांनी कामोठेमधील ५ क्षयरोगग्रस्तांना केली मदत

पनवेल दि.१४ 4News) : रायगड जिल्हा क्षयरोग विभागा मार्फत आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली १०० दिवसीय टीबी मुक्त अभियान संपुर्ण रायगड जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या अभियानात सामाजिक दायित्वच्या भावनेतून माजी नगरसेवक विकास घरत यांनी क्षयरोग निदान झालेल्या कामोठेमधील ५ व्यक्तींना पोषणासाठी सहाय्य दिले. या अभियानात अतिजोखमीच्या व्यक्तींची नॅट आणि एक्स रेच्या मदतीने क्षयरोगासाठी […]

श्री दत्त जयंती सोहळ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी दिल्या भेटी

पनवेल, दि.14 (4kNews) ः आज श्री दत्त जयंती सोहळा पनवेल तालुक्यात मोठ्या धार्मिकतेने तसेच विविध कार्यक्रमाद्वारे संपन्न होत आहे. या सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी भेटी देवून आशिर्वाद घेतले आहे. खारघर, बेलपाडा, रोडपाली, कळंबोली आदींसह ग्रामीण भागातील विविध श्री दत्त जयंती सोहळ्याला जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये […]

पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात सर्व कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश

पनवेल(प्रतिनिधी) महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे पुढील २० वर्षांचे पाण्याचे नियोजन असलेली न्हावा शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा 3ची आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिका आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह पाणीपुरवठा अधिकार्‍यांसमवेत शुक्रवारी पाहणी केली. या वेळी त्यांनी वयाळ ते भोकरपाडा पाईपलाईनच्या सद्यस्थितीत असलेल्या कामाची पाहणी करून या योजनेची सर्व कामे 31 मार्चच्या आधी पूर्ण […]

Back To Top