4k समाचार दि. 21 पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १६ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.आरना पारधी (वय १६ वर्षे ८ महिने) असे या मुलीचे नाव असून तिचे शारीरिक वर्णन पुढीलप्रमाणे आहे – उंची सुमारे ५ फूट, गोरा रंग, गोल चेहरा, मजबूत बांधा. घटना घडली त्यावेळी तिने […]
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे वनवासी विद्यार्थांची आरोग्य तपासणी
4k समाचार पनवेल दि. २१ ( वार्ताहर ) : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत गेली ३५ वर्षे सातत्याने वनवासी कल्याण आश्रम चिंचवली येथील विद्यार्थी आरोग्य दत्तक योजना राबविली जात आहे त्या अंतर्गत वनवासी कल्याण आश्रम चिंचवली येथील विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर, मोफत औषधे वाटप, खाऊ वाटप, आणि तेथील १० वी च्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असे […]
ढोल-ताशा पथकांचा सराव अंतिम टप्प्यात
सार्वजनिक मंडळांचीही सजावटीसाठी जोरदार तयारी
4k समाचारपनवेल दि. २१ ( संजय कदम ) : गणेशोत्सवाचे आगमन आता अवघ्या काही दिवसांवर आले आहे. त्यामुळे पनवेल परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. गणेशोत्सवासाठी पनवेल , नवीन पनवेल , करंजाडे , कामोठे , खांदा वसाहत या भागांतील विविध गणेशोत्सव मंडळे तयारीला लागली आहेत. तर दुसरीकडे गणेशाचे आगमन व विसर्जन करतेवेळी गणेशभक्तांना तालात […]
सोनसाखळी चोर पोलिसांच्या ताब्यात ; २.४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
4k समाचार पनवेल दि. २१ ( संजय कदम ) : रबाळेपोलिसांनी सोनसाखळी खेचणाऱ्या एका सराईत चोरट्याला कोपरखैरणे परिसरातून अटक केली आहे. रोहित शिवाजी गायकवाड (२४) असे त्याचे नाव असून, त्याने घणसोली परिसरात केलेल्या सोनसाखळी चोरीच्या दोन गुन्ह्यांना उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच पोलिसांनी या दोन्ही गुन्ह्यांतील २ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे […]
कळंबोलीत खड्ड्यामुळे दुचाकीस्वारांचा अपघात; शिवसेना कार्यकर्ते मदतीला धावले
4k समाचार पनवेल | कळंबोली सर्कल ते टी पॉईंट दरम्यान रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे अवघ्या एका तासात तब्बल ७ ते ८ दुचाकीस्वार कुटुंबासह कोसळले. या अपघातांमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे शिवसैनिक तत्काळ मदतीला धावून गेले. कामोठे शहर संघटक संतोष गोळे, उप शहर प्रमुख गणेश खांडगे, सचिन […]
भीषण अपघात : अचानक थांबलेल्या बसला कारची धडक, ८ जखमी
4k समाचार दि. 21 नवी मुंबई | एक्सप्रेस हायवेवर आज सकाळी झालेल्या अपघातात तब्बल आठ जण जखमी झाले. धोकादायक पद्धतीने बस उभी करून प्रवाशांना उतरवत असताना मागून आलेल्या कारने बसला जोरदार धडक दिली. या अपघातात दावला हडवळे गंभीर जखमी झाले असून इतर सात जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. जखमींमध्ये विमल हडवळे (५७), अशोक हडवळे (३७), […]
नवी मुंबईत पाणी साचण्यावर आयुक्तांच्या दाव्यांची पोलखोल
4k समाचार दि. 21 नवी मुबंई शहरात पाणी साचलेले नाही, असा दावा आयुक्तांनी केला होता. मात्र, सामाजिक कार्यकर्ते अनरजित चौहान यांनी या दाव्याची पोलखोल केली आहे. चौहान यांनी सांगितले की, नाल्यांमधील उंचीतील फरक आणि नाल्यांच्या मार्गात बांधलेल्या झोपड्यांमुळे पाणी साचत आहे. विशेषतः वाशी सेक्टर २९ आणि तुर्भे एपीएमसी मार्केट परिसरातील नाल्यांजवळ उभारलेल्या झोपड्यांवर कारवाई न […]
अल्पवयीन मुलाला कामाला ठेवले: मालकावर गुन्हा दाखल
4k समाचार दि. 21पनवेल शहरातील सावित्री पेट्रोल पंपावर अल्पवयीन मुलाला हवा भरण्यासाठी ठेवल्याप्रकरणी मालक मंजयकुमार राय यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकान निरीक्षक गजानन जोंधळे यांनी केलेल्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आला. १३ वर्षीय मुलाने स्वतःचे वय सांगितल्यानंतर चौकशी केली असता, मालकाकडे मुलाच्या वयाबाबत कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत.
बसमध्येच शिरले पाणी, प्रवाशांची प्रचंड अडचण
4k समाचार दि. 20 नवी मुंबई गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहरात अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने सामान्य नागरिकांसह नोकरदार वर्गालाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महापे, कल्याण, एमआयडीसी परिसरात पाण्याचा जोरदार त्रास जाणवत असून नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका परिवहन […]
घरकाम करणाऱ्या महिलेने मालकिणीचे ५ लाखांचे दागिने लंपास!
4k समाचार दि. 20 खारघर शहरात विश्वासघातकी घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घरकाम करणाऱ्या महिलेने आपल्या मालकिणीच्या घरातून तब्बल ५ लाखांचे सोन्या-हिऱ्याचे दागिने चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. उषा भंडारी यांच्या घरी काम करणाऱ्या या महिलेला पैशासाठी पर्स उघडल्यावर चोरीचा पर्दाफाश झाला. दागिने गायब झाल्याचे लक्षात येताच उषा भंडारी यांनी तातडीने खारघर पोलिसांकडे धाव घेतली. […]
